breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मुंबईत घरं हवं म्हणून म्हाडाच्या एका घरासाठी एकाच व्यक्तीचे ८३ अर्ज

मुंबईत स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि ते पूर्ण कारण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांची काहीही करण्याची तयारी असते. मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्यामुळे परवडणाऱ्या घरांसाठी फक्त म्हाडाचा एक पर्याय उपलब्ध आहे. घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी एका व्यक्तीने यंदाच्या म्हाडाच्या सोडतीतील उच्च उत्पन्न गटांत तब्बल ८३ अर्ज भरले होते. सरकारी अधिकारी असलेल्या अर्जदाराने स्वत:सह अन्य कुटुंबीयांच्या नावाने अर्ज भरले. अखेरीस त्यातील घाटकोपर, पंतनगरमधील घरांच्या सोडतीत एक घर लाभले.

गेल्या काही वर्षांमध्ये एखाद्या व्यक्तीने घरासाठी ८३ अर्ज भरण्याचा विक्रम पहिल्यांदाच घडला असावा. त्या व्यक्तीला उच्च उत्पन्न गटासाठी एक अर्ज भरताना ७५ हजार रुपयांचा भरणा करावा लागला. सोडत न लागल्यास ही रक्कम पुन्हा अर्जदाराच्या खात्यात जमा होते. पण एकाचवेळी अनेक अर्ज भरताना एवढ्या रकमेची तरतूद करणे अवघड होते. अर्ज भरण्यासाठी त्या व्यक्तीने आपली गावाकडील संपत्ती विकल्याची माहिती मिळाली आहे. ८३ अर्ज भरताना त्या व्यक्तीला ६२ लाख २५ हजार रूपये भरावे लागले.

मुंबईत घर नसलेल्यांना म्हाडाच्या सोडतीचा मोठा आधार ठरतो. त्यामुळे तिथे सर्वच उत्पन्न गटांसाठी प्रचंड प्रमाणात अर्ज येतात. म्हाडाकडून नुकत्याच मुंबईसाठी जाहीर झालेल्या घरांच्या सोडतीत १,३८४ घरांसाठी १ लाख ६५ हजारांहून अधिक अर्ज वैध ठरले. सोडतीत अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गट अशी वर्गवारी आहे. अर्जदारांच्या आर्थिक क्षमतेच्या आधारे सोडतीत अर्ज करता येतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button