breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

#CoronaVirus: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार घेणार पुण्याचा आढावा…

पुणे: लॉकडाउनमुळे ठप्प झालेले पुणे शहर हळूहळू पुर्वपदावर येत आहे. पण पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस झपाट्याने वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहेत. आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुणे शहराच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज पुणे शहराच्या कोरोनाबाबत सद्य स्थितीचा आढावा घेणार आहे. सकाळी 10 च्या सुमारास स्मार्ट सिटी सेंटर इथं आयुक्त,अतिरिक्त आयुक्त महापौर यांच्या हजेरीत ते आढावा घेणार आहे. त्यानंतर  विधान भवनला जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या सोबत बैठक घेणार आहेत.

भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत राष्ट्रवादीने भाजपला सरकार स्थापनेसाठी ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट केला होता.  फडणवीस यांच्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याने प्रतिक्रिया देण्याचे टाळले आहे. त्यामुळे आज शरद पवार यावर काही भाष्य करतील का हे पाहण्याचे उत्सुकतेचं ठरणार आहे.

दोनच दिवसांपूर्वी भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही शरद पवार हे राज्याला लागण झालेले कोरोना आहे, अशी विखारी टीका केलेली होती. पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादीने दोन दिवस राज्यभरात तीव्र आंदोलनं केली असून बारामतीत गुन्हा ही दाखल करण्यात आलेला आहे. त्यामुळे या विषयांवर शर पवार काय बोलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button