breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

घरकुलाचा बेकायदा ताबा; माजी नगरसेवकासह २४ जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी – चिखली येथील महापालिकेच्या घरकुलातील नवीन बांधकामाच्या साईटवर बेकायदेशीरपणे प्रवेश करून ताबा घेणाऱ्या २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी (दि. २५) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारस हा प्रकार घडला.

बांधकाम व्यावसायिक गजानन मारुती गावडे (वय ३७, रा. धायरी पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. घरकुलाच्या इमारतीचे बांधकाम सुरू असताना, महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता येथील डी १२ या इमारतीतील ४२ सदनिकांचा ताबा घेतला.

याप्रकरणी माजी नगरसेवक भीमा सखाराम बोबडे (रा. यमुनानगर, निगडी), युवराज सूर्यभान कोकाटे (रा. नेवाळे वस्ती, चिखली), अशोक रामभाऊ धोंडे, धन्यकुमार अंकुशराव पुजारी, निवृत्ती कृष्णा पवार, भगवान लिंबाजी लांडगे, विजय बळीराम गायकवाड, भगवान दगडू कांबळे, वसंत लक्ष्मण गुरव, सूर्यकांत मलप्पा बनसोड, शिवाजी हनुमंत जाधव, नवनाथ रामचंद्र फडतरे, विजय नारायण जोगदंड, बालाजी गोरोबा शिखरे, बालाजी विश्वनाथ गायकवाड, अशोक सखाराम चव्हाण, भिकु महादेव पोहाडे, देवानंद सदाशिव खांबे, सुरेंद्र त्रिंबकराव ढोणे, रवींद्र माणिकराव बोरकर, राम व्यंकटी गायकवाड यासह महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button