breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वाकड, पिंपळे निलखच्या रस्त्यांचा प्रश्न कायमचा सुटला

  • स्थायी समिती अध्यक्षा ममता गायकवाड यांची मान्यता
  • माजी नगरसेवक विनायक गायवाड यांनी केला पाठपुरावा

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – वाकड आणि पिंपळे निलखमधील सिमेंट काँक्रिटचे रस्ते स्थायी समिती अध्यक्षा ममता विनायक गायकवाड यांच्या पुढाकाराने मार्गी लागले आहेत. आज स्थायी समिती सभेत रस्त्यांच्या विषयांना अध्यक्षा गायकवाड यांनी मंजुरी दिली. त्यामुळे नागरिकांना दळवणवळण अथवा वाहतुकीच्या दृष्टीने सुयोग्य रस्ते लवकरच तयार होणार आहेत.

वाकड आणि पिंपळे निलख परिसरातील कावेरी चौक, सब-वे ते पिंक सिटी कॉर्नर आणि काळेवाडी फाटा ते छत्रपती चौक येथील सिमेंट काँक्रिट रोडच्या विकासकामास स्थायी समिती सभेत आज सभापती गायकवाड यांनी मंजुरी दिली. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली गेले अनेक दिवस वाकड-पिंपळे निलख परिसरातील रोड सिमेंट काँक्रिटचे होण्याकरिता स्थायी समिती अध्यक्षा गायकवाड व माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांनी पाठपुरावा केला आहे.

अध्यक्षा गायकवाड म्हणाल्या की “वाकड-पिंपळे निलखमधील हे सिमेंट काँक्रिटचे रस्ते मॉडेल रोडच्या धर्तीवर तयार करण्यात येणार आहेत. या रस्त्यांमध्ये नागरिकांना चालण्यासाठी प्रशस्त फुटपाथ, पार्किंग व्यवस्था, विविध ठिकाणी सोलर चार्जिंग युनिट, नागरिकांना व ज्येष्ठांना बसण्यासाठी आरामदायी व आकर्षक बेंचेस, डस्टबीन, बोलार्ड बसविणे, फुटपाथलगत हरितपट्टा तयार करण्यात येणार आहे. विविध सेवावाहिन्यांसाठी डक्टची व्यवस्था असणार आहे. असे हे स्मार्ट काँक्रीट रस्ते वाकड-पिंपळे निलख मधील नागरिकांना सोयीचे ठरतील.

स्थायी समिती सभेत रस्त्यांच्या विषयास मंजुरी देताना ह्या रस्त्यांचे काम तातडीने मार्गी लावून रस्ता नागरिकांच्या सोयीसाठी पूर्ण करण्याचे आदेश अध्यक्षा गायकवाड यांनी अधिका-यांना दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button