breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ओटास्कीममधील 20 मुलांच्या पहिल्या तुकडीच्या क्रीडा प्रशिक्षणास सुरुवात

पीसीसीएफ आणि हेवन स्पोर्ट्स क्लबचा उपक्रम

पिंपरी | प्रतिनिधी

नकळतपणे गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणाऱ्या मुलांच्या आयुष्याला योग्य दिशा देऊन उज्ज्वल समाज निर्माण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस, पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) आणि हेवन स्यांपोर्नीट्स डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर (हेवन स्पोर्ट्स क्लब) अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कामगिरी करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जात आहे. क्रीडा क्षेत्रात आवड असलेल्या 20 मुलांच्या पहिल्या तुकडीतील मुलांच्या क्रीडा प्रशिक्षणास सुरुवात झाली आहे.

निगडी येथील मधुकर पवळे शाळेच्या मैदानावर क्रीडा प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सहाय्यक आयुक्त डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

निगडी ओटास्कीम भागातील तरुण योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने गुन्हेगारीकडे वळत आहेत. त्यामुळे त्या तरुणांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे भविष्य अंधारात जात आहे. परिसरातील अल्पवयीन मुले आणि तरुण यांच्यातील सकारात्मक ऊर्जा योग्य ठिकाणी उपयोगी आणल्यास मुलांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा उत्कर्ष होईल, या उद्देशाने पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पीसीसीएफ आणि हर्षद कुलकर्णी यांच्या हेवन स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून या मुलांना प्रशिक्षण देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी ओटास्कीम परिसरातील 150 मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यातील 47 मुलांनी खेळात आवड असल्याचे सांगितले. त्यांच्याशी संपर्क करून त्यातील सुमारे 20 मुलांच्या पहिल्या तुकडीच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम बुधवारी (दि. 30) सुरु झाला. पहिल्या तुकडीतील मुलांना कोणते खेळ आवडतात, त्यानुसार त्यांची शारीरिक क्षमता आहे का याबाबत चाचपणी करत त्यांचा छोट्या छोट्या खेळांमधून स्टॅमिना तपासण्यात आला. मुलांना खेळांबद्दल माहिती देऊन त्यांना आवडणा-या खेळाची माहिती घेण्यात आली. मुलांना दोन ते तीन खेळ माहिती असल्याची बाब यावेळी सामोर आली. त्यामुळे त्यांना स्थानिक ते ऑलम्पिक अशा सर्व स्तरावरील खेळ आणि स्पर्धांची माहिती देऊन गृहपाठ देखील देण्यात आला.

पुढील आठवड्यात मुले खेळाचा गृहपाठ करून पुढील धडे गिरविण्यासाठी येणार आहेत. मुलांसाठी स्वतः पोलीस पुढाकार घेऊन असा अभिनव उपक्रम राबवत आहेत, त्याचा आपण एक भाग आहोत, या जाणिवेने मुले आनंदून केली. मुले देखील विशेष आवड दाखवत खेळात सहभाग घेत आहेत. इतर मुलांच्या आवडीनुसार त्या त्या क्षेत्रातील प्रक्षिशण देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. क्रीडा क्षेत्रात आवड असणा-या मुलांना संदेश बोराडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे संदेश बोराडे प्रशिक्षण देणार आहेत. ते लवकरच या मोहिमेत सहभागी होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button