breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

जिजाऊंच्या स्फूर्ती व प्रेरणेतूनच शिवस्वराज्य साकारले – नरेंद्र बनसोडे

युवक काँग्रेसच्या वतीने जिजाऊ जयंतीनिमित्त अभिवादन

पिपरी | प्रतिनिधी

जिजाऊंच्या विचारांची कास धरून शिवरायांनी स्वराज्य स्थापनेचा निर्धार केला. अन्यायाविरोधात जनन्यायाचे धोरण अवलबंले. यातून रयतेला मोठा आधार, सुरक्षितता व दिलासा देत स्वराज्याची संकल्पना जनमानसात रूजविली. तो इतिहास आजही आजच्या पिढीला व राजकारणाला दिशा देणारा आहे. शिवरायांची युध्दनिती व समतावादी कार्यप्रणाली ही आजही जगविख्यात आहे. या सा-या अलौकिक इतिहासाला घडविणा-या जिजाऊ या ख-या अर्थाने महानमाता, प्रेरणास्त्रोत, शिवस्फूर्ती व स्वराज्यजननी ठरल्या व अजरामर झाल्या. जिजाऊंचे शिक्षण व संस्कार यावर आधारित स्वराज्याची निर्मिती करत शिवराय रयतेचे जाणते राजे ठरले, असे प्रतिपादन युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी केले.

स्वराज्याच्या प्रेरणास्त्रोत राजमाता जिजाऊच्या ४२३ व्या जयंतीनिमित्त पिंपरी चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने भोसरी येथील शिवजिजाऊ स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.  

या प्रसंगी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, शहर सरचिटणीस विरेंद्र गायकवाड, मिंलिद बनसोडे, विशाल सरवदे, रोहन वाघमारे, अनिल सोनकांबळे, पिंपरी विधानसभा युवक काँग्रेस चे अध्यक्ष हिराचंद जाधव, भोसरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नासीर चौधरी, अर्णव कामठे, तेजस पाटील, हर्ष थेटे, सॅम्यूयल पिल्ले, लक्ष्मण म्हेत्रे, साजित खान, मोहम्मद मुश्ताक आदि पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button