breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
VIDEO : नाशिक-मुंबई महामार्गावर चालत्या बसने अचानक घेतला पेट, जीवितहानी नाही
नाशिक-मुंबई महामार्गावरील व्हिलोळी गावाजवळ आज दुपारी 4 वाजेच्या दरम्यान एका चालत्या खासगी बसला आग लागण्याची घटना घडली आहे. मुंबईहून नाशिकच्या दिशेने येणाऱ्या या बसला सुरुवातीला काही भागाला आग लागलेली होती. मात्र काही क्षणात संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याने बस पूर्णतः जळून खाक झाली.
स्थानिक नागरिकांकडून अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. मात्र अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल होईपर्यंत बस संपूर्णत: जळून खाक झाली. घटनास्थळाहून प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितुनसार, या आगेच्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.