breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

‘जय श्री राम’च्या घोषणा देणाऱ्यांवर संतापले उदयनिधी स्टॅलिन; उदयनिधींना भाजपाचा टोला..

नवी दिल्ली : तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दोन दिवसांपूर्वी अहमदाबादमध्ये भारत-पाकिस्तान सामना खेळला गेला. यावेळी पाकिस्तानी फलंदाज ड्रेसिंग रूमकडे परतत असताना प्रेक्षकांनी ‘जय श्री राम’च्या घोषणा दिल्या. यावरून उदयनिधी स्टॅलिन यांनी संताप व्यक्त केला आहे.

उदयनिधी स्टॅलिन म्हणाले, भारत देश आपली खेळभावना आणि आदरातिथ्यासाठी ओळखला जातो. आपल्या शेजारच्या देशातील खेळाडूंबरोबर जे झालं, ती कृती खालच्या स्तरावरची होती. हे सहन करण्यायोग्य नव्हतं. खेळाने देश एकत्र व्हायला हवा. लोकांमधलं प्रेम आणि बंधूभाव वाढायला हवा, लोकांमध्ये तिरस्कार पसरवण्याचं शस्त्र म्हणून खेळाचा वापर केला जाऊ नये.

हेही वाचा – चिपळूणमधील उड्डाणपूल कोसळला, पाहा थरारक घटनेचा व्हिडीओ 

दरम्यान, यावरून भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तिरस्कार पसवणारा डेंग्यू, मलेरियाचा मच्छर विष पसरवण्यासाठी निघाला आहे. नमाज पठण करण्यासाठी सामना थांबवण्याचे प्रकार घडले तेव्हा तुम्ही मूग गिळून गप्प बसला होता. सृष्टीच्या चराचरात आमचे प्रभू श्रीराम आहेत. बोला जय श्रीराम, असा टोला गौरव भाटिया यांनी लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button