breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकात भाजपाची ‘वेट अॅण्ड वॉच’ भूमिका; काँग्रेस – जेडीएसच्या बैठकांना वेग

कर्नाटकात सत्तारूढ काँग्रेस आणि जेडीएसच्या १३ आमदारांनी राजीनामे सोपवल्यानंतर आता भाजपा ‘वेट अॅण्ड वॉच’ च्या भूमिकेत आहे. कर्नाटक भाजपा अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री बी एस येदियुरप्पा यांनी म्हटले आहे की, कर्नाटकच्या राजकारणात सध्या काय सुरू आहे, हे आपण सर्व जाणता आहात. त्यामुळे आता केवळ वाट पहा. तर सिद्धरमय्या यांनी या सर्व घडामोडींच्या मागे भाजपाचा हात असल्याचा आरोप करत, सरकारला काही धोक नसल्याचे सांगितले आहे. याशिवाय काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे हे देखील कर्नाटकात दाखल झाले असुन, परदेश दौऱ्यावर गेलेले मुख्यमंत्री कुमारस्वामी देखील सायंकाळपर्यंत बंगळरूरात पोहचणार आहेत.

तर भाजपाच्या अन्य एका नेत्याने दावा केला आहे की, कर्नाटकातील सध्याच्या राजकीय उलथापलथीला काँग्रेसच जबाबदार आहे. ते एच डी कुमारस्वामींना मुख्यमंत्री पदावरून दुर करू इच्छित आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते प्रल्हाद जोशी यांनी म्हटले आहे की, काँग्रेस मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. एचडी देवेगौडा आणि त्यांच्या परिवारास बाहेर काढण्याची काँग्रेसची योजना आहे. या सर्वांसाठी सिद्धारमय्या आणि काँग्रेसचे काही वरिष्ठ नेते जबाबदार आहेत.

ANI

@ANI

Union Minister&BJP leader Pralhad Joshi on political situation in K’taka: Congress party as a whole is trying throw out HD Kumaraswamy. It’s Congress party’s game plan to out HD Deve Gowda&family. Siddaramaiah is responsible, also some senior Congress leaders are involved in it.

३१ लोक याविषयी बोलत आहेत

दुसरीकडे सिद्धरमय्या यांनी म्हटले आहे की, हे अगदी स्पष्ट आहे की या सर्व कारस्थानांमागे भाजपा आहे. आमदारांचा राजीनामा म्हणजे हे भाजपचं ‘ऑपरेशन लोट्स’ असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र असे जरी असले तरी सर्व काही अलबेल आहे काही काळजी करायचे कारण नाही. राज्य सरकार टिकणार आहे. सरकारला कोणताही धोका नाही,असेही त्यांनी सांगितले.

ANI

@ANI

Congress leader Siddaramaiah on political situation in : This clearly shows that BJP is behind all these defections. It is Operation Kamala…Everything is fine. Don’t worry. Govt will survive, there is no threat to the govt.

३१ लोक याविषयी बोलत आहेत

कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आज सांयकाळी बंगळुरात दाखल होत आहे. त्यानंतर त्यांनी जेडीएस आमदारांची बैठक बोलावली आहे. तर दुसरीकडे कर्नाटक काँग्रेसचे संकटमोचक म्हणु ओळखले जाणारे डीके शिवकुमार यांच्या एकापाठोपाठ एक बैठका सुरू आहेत. त्यांनी आज माजी पंतप्रधान आणि जेडीएस नेते देवगौडा यांच्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भेट घेतली व चर्चा केली. यावेळी काँग्रेस व जेडीएस या दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते.

कर्नाटक सरकारवर आलेले राजकीय संकट दूर करण्यासाठी व काँग्रेस – जेडीएसचे सरकार वाचवण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे कर्नाटकात दाखल झाले आहेत.

ANI

@ANI

Mallikarjun Kharge, Congress, when asked that there are talks that he could be made the Karnataka CM: I don’t know. I want this alliance govt to continue. We want that this should go on smoothly. These are all flimsy information being fed to the press just to divide us.

१५ लोक याविषयी बोलत आहेत

यानंतर त्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री बनवले जाणार असलेल्या अफवा त्यांनी खोडून काढल्या. याबाबत मला कोणतीही सुचना मिळालेली नाही. कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसचे सरकार कायम राहील, अफवांच्यामाध्यामातून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button