breaking-newsमहाराष्ट्र

जागतिक महिला दिन, माजी मुख्यमंत्र्यांच्या दारात महिलांनी मागितली भीक

कराड – हॉकर्स झोनसाठी हातागाडाधारक आक्रमक झाले आहेत. महिला दिना दिवशीच रविवारी ता. आठ मार्च महिला विक्रेत्यांनी शहरात हॉकर्स झोन होत नसल्याच्या निषेधार्थ भिक मांगो आंदोलन केले. आंदाेलक महिलांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या घरी जावून भिक मागीतली. त्याशिवाय हॉकर्स झोन व्हावा, यासाठी लक्ष घालण्याची विनंती केली. श्री. चव्हाण यांचे पुतणे व युवा नेते इंद्रजीत चव्हाण, स्वीय सहायक गजानन आवळकर यांच्याशी त्यांनी चर्चा केली. हातगाडीधारकांनी त्यांना निवेदनही दिले.

अतिक्रमण हटाव मोहिमे सुरू असल्यापासून दहा दिवस व्यवसाय बंद आहे. त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला असतानाही पालिका हॉकर्स झोनबाबत काहीही निर्णय घेत नसल्याचा निषेध फळविक्रेत्या महिलांनी आज भिक मागून आंदोलन केले आङे, असे हातगाडा धारक संघटनचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी सांगितले. सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी हातागाडधारक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांयकाळी चर्चेसाठी बोलालवले आहे, असेही श्री. नायकवडी यांनी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button