breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

मिचेल स्टार्कच्या पत्नीने मोडला कॅप्टन कुल धोनीचा वर्ल्ड रेकॉर्ड

नवी दिल्ली – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्या महिला क्रिकेट संघात तीन सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू आणि दिग्गज गोलंदाज मिचेल स्टार्कची पत्नी एलिसा हेली ने एक खास विक्रम स्वत:च्या नावावर केला. एलिसा आता जगातील सर्वात यशस्वी टी-२० विकेटकिपर झाली आहे.

हेलीने न्यूझीलंडची फलंदाज एमी सॅटरवेटला स्टपिंग करत बाद केले. त्यानंतर तिने लॉरेन डाउनचा कॅच घेतला. यासह एलिसाने टी-२०मध्ये ९२ विकेट पूर्ण केले. ती आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-२० प्रकारात सर्वात जास्त विकेट घेणारी विकेटकिपर झाली आहे.

एलिसाने भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) चा विक्रम मागे टाकला. धोनीने टी-२० क्रिकेटमध्ये ९१ विकेट घेतल्या आहेत. धोनीनंतर इंग्लंडची विकेटकिपर सारा टेलरच्या नावावर सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आहे. साराने टी-२० क्रिकेटमध्ये ७४ बळी घेतले आहेत.

धोनीने भारताकडून ९८ टी-२० सामने खेळले आहेत. तर एलिसाने ११४ सामन्यात धोनीचा विक्रम मागे टाकला. एलिसाने २०१० साली न्यूझीलंडविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. एलिसाने विकेटकिपिंग सोबत बॅटिंगमध्ये देखील शानदार कामगिरी केली आहे. तिने १३१.६७च्या सरासरीने दोन हजार पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. एलिसाने २०१८ साली टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत मालिकावीर पुरस्कार मिळवला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button