breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

बहुजनांची पोरं आजोबा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही, पडळकरांची टीका

चौंडी (कर्जत) : आज नातवाला लॉन्च करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी शरद पवार यांनी चौंडीत येऊन राजकारण केलं. राजकारणासाठी प्रेरणास्थळाचा वापर कसा काय करता, आम्ही याला कडाडून विरोध करु. मल्हारराव होळकर मुघलांच्या छाताडावर नाचले होते. यशवंतराव होळकरांनी इंग्रजांना चिरडलं होतं. पवारांना सांगू इच्छितो पोलीस बळाचा वापर करुन तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही. महाराष्ट्रातली बहुजनांची पोरं आजोबा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही, अशी बोचरी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार पवार आणि रोहित पवार यांच्यावर केली.

अहिल्यादेवी होळकर यांच्या २९७ व्या जयंतीच्या दिवशी अहमदनगरच्या चौंडीत सध्या हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चौंडी येथे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला शरद पवारही उपस्थित आहेत. याठिकाणी जाण्यासाठी निघालेल्या गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या गाड्यांचा ताफा पोलिसांनी अडवला आहे. यावरुन सध्या पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्याशी पोलिसांनी जोरदार बाचाबाची झाली. शरद पवार यांनी पोलिसांच्या माध्यमातून कितीही दबाव आणला तरी आम्ही चौंडीला जाणारच, असा निर्धार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.

“शरद पवार आणि त्यांचा नातू रोहित पवार या दोघांनीही पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या चौंडीमध्ये गलिच्छ राजकारण केलं, त्याबद्दल मी प्रथम त्यांचा निषेध व्यक्त करतो. शरद पवार यांची सभा सुरु असल्याने आम्हाला अहिल्यादेवी यांच्या दर्शनाला जाऊ देत नाहीत. शरद पवार कोण आहेत, आम्हाला रोखण्याचं काय कारण आहे?, हे गलिच्छ राजकारण सुरु असून आम्ही बहुजनांची पोरं हे राजकारण सहन करणार नाही”, असं पडळकर म्हणाले.

“शरद पवार कोण आहेत, त्यांच्या सभेला परवानगी कशी काय दिली गेली? खरंतर त्यांच्या सभेला परवानगी नाकारायला हवी होती. महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री होते. दोन वेळा केंद्रात मंत्री होते, त्यावेळी जयंती दिसली नाही का?, असा परखड सवाल पडळकरांनी केला. “आज नातवाला लॉन्च करण्यासाठी आमच्या प्रेरणास्थळाचा वापर कसा काय करता, आम्ही याला कडाडून विरोध करु. मल्हारराव होळकर मुघलांच्या छाताडावर नाचले होते. यशवंतराव होळकरांनी इंग्रजांना चिरडलं होतं. पवारांना सांगू इच्छितो पोलीस बळाचा वापर करुन तुम्ही आम्हाला रोखू शकत नाही. महाराष्ट्रातली बहुजनांची पोरं आजोबा-नातवाच्या छाताडावर नाचल्याशिवाय राहणार नाही, अशी बोचरी टीका पडळकरांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button