breaking-newsताज्या घडामोडीपुणे

जंबो कोविड सेंटरमध्ये महिला डॉक्‍टरचा विनयभंग

दोन डॉक्‍टरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे |महाईन्यूज|

करोना रुग्णांच्या उपचारासाठी उभारलेल्या शिवाजीनगर येथील जंबो कोविड सेंटरमध्ये एका महिला डॉक्‍टरचा विनयभंग केल्याप्रकरणी दोन डॉक्‍टरांचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. सत्र न्यायाधीश आर. यु. मालवणकर यांनी हा आदेश दिला.

अटकपूर्व जामीन मंजुर केल्यास दोघे पुराव्यामध्ये ढवळाढवळ करण्याची शक्‍यता आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. अटक करून दोघांकडे तपास करणे आवश्‍यक आहे. त्यासाठी दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळावा, असा युक्तीवाद अतिरिक्त सरकारी वकील ऍड. मारुती वाडेकर यांनी केली होती. न्यायालयाने तो ग्राह्य धरत दोघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला.

या प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी डॉ. योगेश भद्रा आणि डॉ. अजय बागलकोट या दोन्ही डॉक्‍टरवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका 25 वर्षीय महिला डॉक्‍टरने फिर्याद दाखल केली आहे. 29 सप्टेंबर रोजी रात्री दोनच्या सुमारास हा प्रकार घडला होता

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button