breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

शनी मंदिर-वाकड परिसरातील ‘आरएमसी प्लँट’मुळे हवा, ध्वनी प्रदूषणाचा ‘उच्चांक’ ; नागरी आरोग्याचा प्रश्न!

सोसायटीधारकांकडून प्रशासनाकडे तक्रार : प्लँटमुळे विद्यार्थ्यांसह रहिवाशी हैराण

पिंपरी । विशेष प्रतिनिधी 

वाकड, इंदिरा कॉलेज रोडवर असलेल्या ‘आरएमसी प्लँट’मुळे परिसरात हवा व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महापालिका प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी स्थानिक सोसायटीधारकांकडून केली जात आहे. 

शनी मंदिर, इंदिरा कॉलेज रोड परिसरात रेडी मिस्क काँक्रिट (आरएमसी) प्ल्ँट आहेत. या भागात मोठ्या प्रमाणात धुळीचे साम्राज्य असते. परिसरात शाळा, कॉलेज आणि रहिवाशी क्षेत्र असल्यामुळे विद्यार्थी, नागरिकांना श्वसानाचा त्रास होत आहे. तसेच, हवा शुद्धतेवरही परिणाम होत आहे. या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहने आणि आरएमसी ट्रक रहदारी करीत आहेत. या वाहनांकडून कोणत्याही वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. वेगावर नियंत्रण नसल्यामुळे अनेकदा अपघाताची परिस्थिती उद्धवली आहे. त्यामुळे पदाचारी आणि प्रवाशांमध्ये धोकादायकपणे प्रवास करावा लागतो. 

विशेष म्हणजे, या भागातील बहुतेक आरएमसी प्लँट दिवसाचे २४ तास कार्यान्वयीत असतात. रात्री-अपरात्री वाहनांची वर्दळ आणि प्लँटमधील मशीनचा मोठा आवास सुरू असतो. हवा प्रदूषणासोबतच ध्वनी प्रदूषणा हा सुद्धा कळीचा मुद्दा बनला आहे. 

दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे रहिवाशांनी तक्रार नोंदवली होती. त्यावर काही अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असून, कारवाई करण्याबाबत सूचना केली आहे. 

महापालिका आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष… 

महापालिका प्रशासनाने या गंभीर समस्येबाबत तात्काळ चौकशी करावी. नागरी आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाबाबत सकारात्मक कार्यवाही करावी. तसेच, स्थानिक नागरीक, सोसायटीधाकरांच्या हिताच्या दृष्टीने कायमस्वरुपी ठोस उपाययोजना कराव्यात आणि प्रदूषणमुक्त परिसर आणि वाहतूक कोंडीमुक्त रस्ते उपलब्ध करुन द्यावेत, अशी आग्रही मागणी रहिवाशांनी केली आहे. याबाबत महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना सोसायटीधारकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन दिले आहे. त्यामुळे आयुक्त सकारात्मक प्रतिसाद दिला असून, कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. 

शहरातील नागरीकांचे आरोग्य आणि पर्यावरण याबाबत महापालिका प्रशासनाने सतर्क असले पाहिजे. रहिवाशी क्षेत्रातील आरएमसी प्लँटमुळे स्थानिक नागरिकांना ध्वनी आणि हवा प्रदूषणाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. वाहतूक समस्याही वाढलेली आहे. यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी स्थानिक सदनिकाधारकांची मागणी आहे. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांना लेखी निवेदनही दिले आहे. या प्रश्नसंदर्भात तात्काळ कारवाई करावी, अशी आमची आग्रही मागणी आहे.
– सचिन लोंढे, उपाध्यक्ष, पिंपरी-चिंचवड सोसायटी फेडरेशन.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button