breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पन्नास टक्के रुग्णांसाठी वायसीएम रुग्णालय ‘नाॅन कोविड’

महापाैर उषा ढोरे यांची पत्रकार परिषदेत घोषणा, उद्यापासून होणार अमंलबजावणी

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालय हे कोविड समर्पित केले होते. त्यामुळे मागील आठ महिन्यापासून इतर आजारांच्या रुग्णांवर वायसीएममध्ये उपचार होत नव्हते. यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय झाली आहे. मात्र, शहरातील कोविड रुग्ण संख्या कमी झाल्याने वायसीएम रुग्णालय 50 टक्के नाॅन कोविड रुग्णांवर उपचार करण्यात येईल. याविषयी अमंलबजावणी उद्या (मंगळवार) पासून करण्यात येईल, अशी घोषणा महापाैर उषा ढोरे यांनी पत्रकार परिषदेत केली.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, आयुक्त श्रावण हर्डिकर, नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, अप्पर आयुक्त अजित पवार, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डाॅ. पवन साळवे, सहायक आरोग्य अधिकारी डाॅ. लक्ष्मण गोफणे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये मार्च महिन्यामध्ये करोनाचे रुग्ण आढळले. त्यानंतर मार्च महिन्यापासून शहरातील रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली. शहरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत महापालिकेने वायसीएम रुग्णालय कोविड समर्पित केले. तर वायसीएममध्ये येणाऱ्या अन्य आजारावरील रुग्णांना डी. वाय. पाटील रुग्णालयाचा पर्याय देण्यात आला. वायसीएममध्ये बाधित लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार सुरू केले.

वायसीएम रुग्णालयामध्ये सातशे बेडची व्यवस्था आहे. याठिकाणी विविध आजारांवर उपचार केले जातात. वायसीएम रुग्णालयामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी येतात. शहरातील सर्वात मोठे रुग्णालय असल्याने याठिकाणी प्रसुतीसाठी विविध जिल्ह्यातून महिलांना आणले जाते. तसेच विविध लसीकरणाची सोय दर महिन्याला केली जाते. रुग्णालय कोविड समर्पित केल्याने याठिकाणी येणाऱ्या शहरातील इतर आजारांच्या रुग्णांसोबतच आजूबाजूच्या रुग्णांचीही मोठी गैरसोय झाली आहे.

शहरात सध्यस्थितीत कोविड पाॅझिटिव्ह रुग्ण संख्या कमी झाल्याने वायसीएम रुग्णालयात इतर आजारांच्या रुग्णांसाठी पूर्ववत करण्याचे आदेश महापाैर ढोरे यांनी दिले. त्यानूसार प्रशासनाने 50 टक्के नाॅन कोविड रुग्णालय करण्याचा निर्णय घेतला. त्यानूसार उद्यापासून त्याची अमंलबजावणी करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button