breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखली, जाधववाडी परिसरातील अनधिकृत बांधकामाकडे अधिका-यांचे दुर्लक्ष

  • प्राधिकरणाच्या जागेवर उभारली अनधिकृत भाजी मंडई

पिंपरी ( महा ई न्यूज ) – चिखली, जाधववाडी, कुदळवाडी परिसरात अनधिकृत बांधकामासह पत्राशेड मोठ्या प्रमाणात उभारण्यात येत आहे. लोकसभा निवडणुक आचारसंहितेचा फायदा उठवत अनेकांनी पत्राशेडसह बांधकामे केली आहेत. सदरील बांधकामे व पत्राशेड उभारण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींचा पाठबळ मिळत असल्याने नागरिक धाडस करु लागले आहेत. तेथील प्राधिकरणाच्या जागेवर भाजी मंडईसाठी पत्राशेड एका बिल्डराकडून अनधिकृतपणे बांधून घेतले आहे. या बांधकामासह पत्राशेडकडे महापालिकेच्या बांधकाम विभाग अधिका-यांनी जाणिवपुर्वक कानाडोळा केल्याने विद्रुपीकरण वाढले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील चिखली, जाधववाडी, कुदळवाडी परिसरात विकास कामांचा खेळखंडोबा झाला आहे. बाह्य व अंतर्गत रस्ते, पथदिवे, ड्रेनेज लाईन, उद्याने, क्रिंडागणे यासह स्वच्छतागृहाचा देखील अभाव आहे. तेथील नागरिकांनी पिण्याचे पाण्याची टंचाई देखील मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. ड्रेनेज व्यवस्था नसल्याने अनेक भागात रस्त्यावरच पाणी सोडले जात आहे. तसेच कित्येक ठिकाणी पाणी साठून डासा उत्पत्ती होवू लागली आहे. महापालिका आरोग्य विभागाकडून धुर फवारणी देखील केली जात नाही.

चिखली, जाधववाडी परिसरातील बाह्य आणि अंतर्गत रस्त्यांची वाट लागली आहे. परिसरातील रस्त्याची कामे अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. पावसाळा तोंडावर आला असताना देखील नाले साफसफाईचे कामे अजून सुरु झालेली नाहीत. नागरिकांच्या पाणी टंचाई, ड्रेनेजची साफसफाई, रस्त्यांची बिकट अवस्था, पथदिव्ये यासह पायाभूत सोयी-सुविधा अभाव दिसून येत आहे.

दरम्यान, अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे, पत्राशेड उभारणी जागोजागी होवू लागली आहे. याकडे बांधकाम विभागाचे बीट निरीक्षक, उपअभियंता हे आर्थिक संगणमताने अनधिकृत बांधकामे वाढवण्यास पाठबळ देत आहेत. तसेच स्थानिक लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरुन एका बिल्डराने नवनगर विकास प्राधिकरणाच्या जागेवर अनधिकृतपणे पत्राशेड मारुन भाजी मंडई तयार केली आहे. त्या भाजी मंडई उभारण्यासाठी काही विक्रेत्याकडून आर्थिक व्यवहार केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चिखली, जाधववाडी आणि कुदळवाडीत विकास कामांच्या नावाने बोंबाबोंब सुरु आहे. लोकप्रतिनिधी सक्षम नसल्याने नागरी समस्या सोडवण्याकडे दुर्लक्ष होवू लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button