breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी; आर्ट आॅफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी धरणे आंदोलन

थेरगांवच्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर रविवारी संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री श्री रविशंकर यांचेवर गुन्हा दाखल करावा, याकरिता संभाजी ब्रिगेडच्या वतीने येत्या रविवारी सकाळी ११ वाजता थेरगावमध्ये धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

अखंड भारताचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून रामदास स्वामी आणि छत्रपती शिवरायांचा दूरदूर पर्यंत कसलाही संबंध नाही. तरीही छत्रपती शिवाजी महाराजांना जाणीवपुर्वक कमी लेखुण आणि रामदास स्वामीचे उदात्तीकरण करण्याचा अनऐतिहासिक प्रयत्न आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर यांनी केला आहे.

तसेच आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री श्री रविशंकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य सांभाळून व लढाया करुन थकुण गेले आहेत. रामदास स्वामी स्वराज्याचे राजे आहेत. शिवाजी महाराज रामदासाचे शिष्य आहेत. तसेच रामदास स्वामीच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज आपले गुडघे टेकून आपला मुकुट आणि तलवार रामदासाच्या चरणी अर्पण असलेचा व्हिडिओ श्री श्री रविशंकर यांनी आपल्या अधिकृत युट्युब चैनलवरुन प्रसारीत केलेला आहे. या आशयाचा लेख देखील प्रकाशित केलेला आहे.

त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमी जनतेच्या धार्मिक श्रधांचा अपमान झालेला आहे. त्यामुळे श्री श्री श्री रविशंकर याचेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी रविवार (दि ९) सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे सतीश काळे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button