breaking-newsआरोग्य

‘दही-भात’ आलियाची फेव्हरेट डिश…

‘दही-भात खाण शरिरासाठी उत्तम असंत.शक्यतो आपण सर्वचजण खात असतो पण अभिनेत्री आलिया भटचीही दही-भात ही फेव्हरेट डिश आहे. दही-भात खाणं ती नेहमीच पसंत करते. त्यामुळं तिचं आरोग्य निरोगी राहतं आणि त्वचाही सुंदर बनते,’ असं आलिया भट्टने एका कुकींग शोच्या व्हिडिओत बोलताना सांगितलं होतं. खरं तर आलिया पंचपक्वान्न न खाता दही भात खाते हे आश्चर्य वाटण्यासारखंच आहे. परंतु दही भात खाल्ल्याने आरोग्य उत्तम राहते असं आलिया म्हणते. पाहुयात, दही भात खाणं हे तुमच्या आरोग्यासाठी कसं फायदेशीर आहे…

दही भात-खाणं आरोग्यासाठी फायदेशीर कसं आहे ते पाहुयात...

दही-भात हे फूड साधं सुधं नसून उत्तम आरोग्यासाठी आणि मुलायम त्वचेसाठी फायदेशीर आहे. दह्यात असलेल्या प्रो-बायॉटिक गुणामुळे अन्न पचायला मदत होते. तसंच सफेद भाताच्या फायबरची क्षमता कमी होते. जेव्हा कधी तुम्हाला अपचन झाल्यासारखं वाटत असेल तेव्हा तुम्ही दही- भात खाऊन या अपचनाच्या समस्येवर मात करु शकता.

मुलायम त्वचेसाठी फायदेशीर

ज्या माणसांना अन्न खाल्ल्यावर अपचन होतं, त्यांना त्वचेच्या समस्यांना सामोरं जावं लागतं. दही -भात खाल्ल्यावर तुमच्या पोटात थंडावा निर्माण होण्याबरोबरच पचनक्रियाही सुधारते आणि तुमच्या त्वचेलाही सुंदरता प्राप्त होते.

साखरेचं प्रमाण नियत्रित राहतं

दही-भात बनवताना त्यामध्ये कडीपत्ताही टाकतात. या कडीपत्त्यात अॅन्टी- हायपरग्लासेमिक इंडेक्स असतं. भाताचाही हायपरग्लासेमिक इंडेक्स कमी असतो. जेवल्यानंतर अन्न पचन झाल्यावर रक्तातील साखरेचं प्रमाण किती लवकर वाढतं हे हायपरग्लासेमिक इंडेक्स दर्शवतं. दही -भात खाल्ल्यावर रक्तातील साखरेच प्रमाण नियत्रित राहतं.

मानसिक संतुलन राहतं उत्तम

दह्यात चांगले फॅट्स आणि प्रोबायॉटिक गुण असल्यामुळं तुम्हाला स्ट्रेस आणि पोटदु:खीचा त्रास जाणवत नाही. त्यामुळं तुमचं मानसिक संतुलन बिघडत नाही आणि तुम्हाला फ्रेश असल्यासारखं वाटतं.

स्नायुंना आणि केसांना करतं मजबूत

दही -भातात मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असतात. दही भाताच्या संयोजनामुळं शरीरात प्रोटीन्स चांगल्या प्रमाणात पोहोचतं. तुमच्या शरीरातील स्नायू, केस,नखे मजबूत ठेवण्यात दही-भाताचा उपयोग होतो. तसच टीश्यू रिपेअर, हार्मोन्स बॅलेन्स ठेवण्यासाठी दही-भात खाणं आवश्यक आहे.

हाडांनाही करतं मजबूत

दही- भात खाल्ल्यानं शरीराला कॅल्शियम मिळतं. हाडे मजबूत करण्यासाठी कॅल्शियमची नितांत गरज असते. तसच हृदय, स्नायू आणि मेंदूलाही सक्रीय ठेवण्यासाठी कॅल्शियम आवश्यक असतं. दही -भात खाल्ल्यानं दातही निरोगी आणि मजबूत राहतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button