breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष बनवण्याचे लक्ष्य’; दिपक मानकर

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मॅरेथॉन बैठक

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष बनवण्याचे लक्ष सर्व कार्यकर्त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे, असे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी सांगितले.

याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयाजवळ महिला विकास मंडळ सभागृहात मॅरेथॉन बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. बैठकांमध्ये पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, प्रवक्ते, फ्रंटल व सेलचे राज्यप्रमुख, महिला, युवती, विद्यार्थी यांना निवडणुकांच्या दृष्टीने चर्चा करत मार्गदर्शन केले.

हेही वाचा – मोदी सरकारने वाढविला देशावरील कर्जाचा डोंगर; भारतावर ‘इतक्या’ कोटींचं कर्ज

तसेच नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. यावेळी पक्षातील विविध पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते, अशी माहिती शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी दिली. दरम्यान, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात दीपक मानकर यांनी पक्ष बांधणीवर जोर दिला आहे. नवनवीन कार्यकर्त्यांना पक्षात संधी दिली जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button