breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

चीन, इराण, सिंगापूरचा अनावश्यक प्रवास टाळा ; केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा सल्ला

नवी दिल्ली | देशामध्ये कोरोना विषाणूची दोन नवीन रुग्ण आढळल्यानंतर केंद्र सरकारने नवीन प्रवासी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार सध्या चीन आणि इराणला जाणाऱ्यांना व्हिसा देण्यात येणार नाही.

तसेच, परिस्थिती अधिक गंभीर झाली तर इतर देशांसाठीही प्रवासी निर्बंध घातले जाऊ शकतात, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली. दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना आरोग्य मंत्र्यांनी ही माहिती दिली. तसंच, ‘भारतीयांनी आवश्यकता नसेल तर चीन, इराण, कोरिया, सिंगापूर आणि इटलीचा प्रवास करणे टाळावे, असा सल्ला केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिली.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयाने सोमवारी भारतात कोरोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती दिली होती. एक रुग्ण दिल्ली तर दुसरा रुग्ण तेंलगणा येथे आढळल्याची माहिती आरोग्य मंत्र्यालयाने दिली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button