breaking-newsपिंपरी / चिंचवड

Social Work : युवासेनेतर्फे पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये सुसंवाद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

शालेय परिसरामध्ये विद्यार्थिनींना छेडछाडीच्या प्रकाराला सामोरे जावे लागू नये, चुकीचं वर्तन करणाऱ्यांवर वेळीच कारवाई व्हावी व विद्यार्थी आणि पोलीस ह्यांच्यात सुसंवाद वाढावा, यासाठी भोसरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कैलासे ह्यांनी फुगेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी काही गैरप्रकार होत असल्यास माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पी. एस. आय. कदम, पोलीस नाईक नागरे,  युवासेनेचे विभागसंघटक निलेश हाके, आशीर्वाद महिला बचतगटाचे शीला जाधव, मुख्यध्यापिका पवार, पानसरे, माने आदी उपस्थीत होते.विद्यार्थ्यांनी पोलीसांशी संपर्क करताना घाबरू नये असे आवाहनही, सहायक पोलीस निरीक्षक कैलासे यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button