breaking-newsआंतरराष्टीय

चीनमध्ये विचित्र अपघातात 31 वाहने धडकली-13 ठार 44 जखमी

बीजिंग (चीन)- चीनमध्ये झालेल्या एका विचित्र अपघातात 31 वाहने एकमेकांवर धडकून किमान 13 जण मरण पावले आहेत आणि 44 जण जखमी झाले आहेत. अपघाताच्या ठिकाणी वाहनांच्या मोडतोड झालेल्या आणि जळलेल्या अवशेषांचा ढीग झालेला आहे. गान्सू प्रांतात शनिवारी हा विचित्र अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार लान्झाऊ-हायकाव एक्‍स्प्रेसवेवर हा अपघात घडला. वेगाने येणारा एका हेवी ट्रक ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने टोल प्लाझावर लायनीत उभ्या असलेल्या वाहनांवर जाऊन आदळला. त्यानंतर झालेल्या वाहनांच्या मोडतोडीत आणि लागलेल्या आगीत 13 जण मरण पावले आणि अन्य 44 जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. अलीकडेच चोंगकिंग येथे एक महिला आणि ड्रायव्हर यांच्या वादात बस यांगत्से नदीत पडून 13 जण मरण पावले होते. प्राणघातक अपघात ही चीनमधील नित्याची गोष्ट असून बेशिस्त वाहतूक आणि वाहतुकीच्या नियमांचा भंग हे त्यांचे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button