breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

चीनमधील कोरोनाच्या 158 रूग्णांवर रेमडेसिविर औषधाची चाचणी अयशस्वी ठरली

न्यूयॉर्क | भारत-अमेरिकासह अनेक देश कोरोनाव्हायरसशी लढत आहेत. बरेच शास्त्रज्ञ लस तयार करण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. चीनमध्येही रेमडेसिविर औषधाची चाचणी रूग्णांवर घेण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ही चाचणी फोल ठरली. या चाचणीशी संबंधित माहिती जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) साइटवर प्रकाशित केली गेली.

डब्ल्यूएचओने ते काढून टाकले होते आणि म्हटले होते की हा अहवाल चुकून अपलोड केला गेला आहे. हे औषध अमेरिकन कंपनी गिलियड सायन्सचे आहे. सर्व देशांना अँटी-व्हायरल औषध रेमडेसिविर ड्रगच्या ट्रायलबाबत मोठी आशा होती. मात्र चीनमध्ये रेमडेसिविर ड्रगमुळे रुग्णांमध्ये कोणतीच सुधारणा दिसली नाही. रिपोर्टनुसार, 237 रुग्णांवर ही चाचणी करण्यात आली. यातील 158 जणांना रेमडेसिविर आणि इतर 79 जणांना प्लेसीबो देण्यात आले. एक महिन्यानंतर रेमडेसिविर घेणारे 13.9% आणि प्लेसीबो घेणारे 12.8% रुग्णांचा मृत्यू झाला. साइड इफेक्टमुळे ट्रायल सुरुवातीलाच थांबवण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button