breaking-newsमुंबई

राज्यातील जवळपास 1300 डॉक्टरांचा आंदोलनाचा पवित्रा

मुंबई : राज्यातील जवळपास 1300 डॉक्टरांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. यामध्ये 18 वैद्यकीय महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांचा समावेश आहे. मागील 5 वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयात काम करून देखील अद्याप नोकरीत कायम न केल्यामुळे या डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासोबतच त्यांना मार्च महिन्याचा पगार देखील 50 टक्केच देण्यात आला आहे. एकीकडे केरळातून दीड ते दोन लाख रुपये पगार देऊन डॉक्टरांना आणण्यात येतं आणि इथ काम करणाऱ्यांना पगार व्यवस्थित देण्यात येत नाही आणि नोकरीत कायमही करण्यात येत नाही. त्यामुळे संपूर्ण आयुष्य अधांतरी चाललं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे

याबाबत बोलताना महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. सचिन मूलकुटकर म्हणाले की, आम्ही आमच्या सहाय्यक प्राध्यापकांच्या मागणीबाबत वैद्यकीय राज्यमंत्री अमित देशमुख, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन आमच्या मागणीबाबत त्यांच्याशी चर्चा केली आहे. परंतू अद्याप आमची मागणी मान्य झालेली नाही. सध्या कोरोनाची भयावह परिस्थिती आहे तरीदेखील डॉक्टर एकही सुट्टी न घेता कामावर येतं आहेत. त्यामुळे शासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि मागण्या मान्य कराव्यात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button