breaking-newsमुंबई

मुख्यमंत्र्यांना आलेल्या धमकीची NIA चौकशी करा, मनसेची मागणी!

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल (६ सप्टेंबर) त्यांचे मातोश्री निवासस्थान उडवून टाकण्याची धमकी आली होती. या धमकीच्या फोनचा NIA कडून तपास करावा, अशी मागणी मसेनेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी केली आहे. दुबईहून कॉल करुन ही धमकी देण्यात आली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन आला आहे.

“आतंरराष्ट्रीय कॉल असल्याने हे प्रकरण गंभीर आहे. आमचा मुंबई पोलिसांच्या सुरक्षेवर विश्वास आहे, ते त्यांच्या सुरक्षेची कामगिरी चोख बजावतील. पण आंतरराष्ट्रीय कॉल असल्याने तो कुठल्या दहशतवादी टोळीशी संबंधित आहे का याचाही तपास होणे गरजेचे आहे. त्यामुळे NIA तपासाची मागणी करत आहोत,” असे संदीप देशपांडे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button