breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिंचवड मतदारसंघातील नागरिकांना घरपोच मिळणार भाजीपाला

सोशल डिस्टंसिंगच्या पालनासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांचा सामाजिक उपक्रम

पिंपरी, – चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांनो संचारबंदीच्या काळातही तुम्हाला भाजीपाला आणण्यासाठी घराबाहेर पडावे लागत असेल आणि कोरोनाचा संसर्ग होईल याची भिती वाटत असेल, तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टने “तुमच्या सोसायटीच्या किंवा घराच्या दारापर्यंत भाजापीला” पोहोचविण्याचा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. गेल्या चार दिवसांपासून ना-नफा-ना-तोटा या तत्त्वावर सुरू असलेल्या या सामाजिक उपक्रमाची एकच अट आहे. ती म्हणजे तुम्हाला आठवडाभरासाठी लागणाऱ्या भाजीपाल्याची मागणी एक दिवस आधी नोंदवावी लागेल. त्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांनी “7507411111” ही हेल्पलाइन क्रमांक सुरू केली आहे. 

या क्रमांकावर तुम्हाला लागणारा भाजीपाला आणि संपूर्ण पत्ता व्हॉट्सअॅप करा. तुमच्या दारापर्यंत येऊन भाजीपाला पोहोच केला जाणार आहे. तर मग विचार काय करताय घरीच बसा आणि हेल्पलाइन क्रमांकावर नोंदणी करून घराच्या दारापुढे भाजीपाला मिळवा.


कोरोनाचा वाढता संसर्ग रोखणे गरजेचे आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. हा लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत असणार आहे. नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या दंडुक्याचा प्रसाद खावा लागत आहे. या लॉकडाऊनमधून जीवनावश्यक वस्तूंना वगळण्यात आले आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही किराणा माल, मेडिकल, हॉस्पिटल, भाजी मंडईसह अन्य जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत. या काळात सोशल डिस्टंसिंग (एकमेकांपासून दुरावा) पाळणे अत्यंत गरजेचे आहे. किंबहुना नागरिकांनी एकमेकांच्या संपर्कात जास्त येऊ नये यासाठीच लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तसे झाले तरच कोरोनाचा संसर्ग रोखणे शक्य होणार आहे. परंतु, नागरिक बाजारात भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्यामुळे सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसल्याचे चित्र आहे.


अशा परिस्थितीत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजीपाला खरेदीसाठी बाजारात गर्दी करणाऱ्या नागरिकांच्या दारापर्यंत भाजीपाला पोहोचविण्याचा सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांनी चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी ना-नफा-ना-तोटा तत्त्वावर ऑर्डर फ्रॉम होम सेवा सुरू केली आहे. त्यासाठी फक्त एकच अट घालण्यात आली आहे. नागरिकांनी त्यांना लागणाऱ्या भाजीपाल्याची मागणी एक दिवस आधी नोंदविणे गरजेचे आहे. ही नोंदणी 7507411111 या हेल्पलाइन क्रमांकावर आपल्या संपूर्ण पत्त्यासह व्हॉट्सअॅपद्वारे करावी लागणार आहे. त्यानंतर नागरिकांनी मागणी केलेला भाजीपाला तुमच्या दारापर्यंत ना-नफा-ना-तोटा तत्त्वावर पोहोचविण्यात येईल.


कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि त्याला पराभूत करण्यासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन होणे गरजेचे आहे. त्यामुळे भाजी घेण्यासाठी घराबाहेर पडून गर्दी न करता या हेल्पलाइन क्रमांकाद्वारे घरी बसूनच भाजीपाला घेऊन सोशल डिस्टंसिंग राखूया आणि कोरोनाचा पराभव करूया. चिंचवड मतदारसंघातील नागरिकांनी भाजीपाला घेण्यासाठी भाजीमंडई अथवा इमारतीच्या आवारात भाजीचा टेम्पो आल्यानंतर गर्दी करू नये.

7507411111 या हेल्पाइन क्रमांकावर भाजीपाल्याची नोंदणी करून दारात आल्यानंतर कुटुंबातील एका व्यक्तीने येऊन तो घ्यावा. सोशल डिस्टंसिंगचे पालन करून कोरोनाला आपल्या देशातून हद्दपार करूया, असे आवाहन आमदार लक्ष्मण जगताप यांनी केले आहे. तसेच अधिक माहितीसाठी तेजस्विनी ढोमसे (9960435905), सुदेश राजे (9823905915), विनायक गायकवाड (8657169169), संकेत चोंधे (9970510000), संकेत कुटे (9823495359), विनोद तापकीर (9822880397), बिभिषण चौधरी (9763701833), नितीन इंगवले (9850535323) आणि निलेश (9923794635) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही आमदार जगताप यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button