breaking-newsराष्ट्रिय

विशाखापट्टनममधील केमिकल कंपनीत भीषण आग

विशाखापट्टनम: आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टनम येथे सोमवारी (13 जुलै) रात्री एका फार्मास्युटीकल कंपनीत मोठा स्फोट झाला . यामुळे लागलेल्या भीषण आगीत अनेकजण जखमी झाले आहेत. या स्फोटामुळे परवाडा भागातील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच या भागात एलजी पॉलीमर्समध्ये गॅस गळतीमुळे मोठा अपघात झाला होता. यात 14 जणांचा मृत्यू झाला होता.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदा फार्मा सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटाचे आवाज ऐकू आले आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली. रेमकी सॉल्व्हंट्सच्या एका भागात कोस्टल वेस्ट प्रकल्पाच्या ठिकाणी ही घटना घडली. या आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे. अद्याप आगीचं कारण स्पष्ट झालेलं नाही. या स्फोटामुळे लागलेली आग इतकी भीषण होती की संपूर्ण विशाखापट्टनम शहरातून ही आग दिसत होती. आगीवर विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button