breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘त्यांची वक्तव्य जोकरसारखी, पण मी त्यांना जोकर म्हणत नाहीये’, देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोमणा

मुंबई:शिवसेना खासदार संजय राऊत हे जोकरसारखे वक्तव्य करत असतात, असं म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांना टोमणा लगावला आहे. देवेंद्र फडणवीसांनी आज पत्रकार परिषद घेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरील ईडी कारवाईवर प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांना संजय राऊतांनी केलेल्या आरोपांबाबत प्रश्न विचारण्यात आला.

संजय राऊत यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करत आरोप केला होता की, ‘४८ तासांसाठी ईडी आम्हाला भाडेतत्वावर द्या, तर देवेंद्र फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील’. त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘ते जोकर सारखे वक्तव्य करतात, मी त्यांना जोकर म्हणत नाहीये. पण, जोकर सारखी वक्तव्य ते नेहमीच करत असतात. त्याच्यावर काय उत्तर द्यायचं, असं म्हणत फडणवीसांनी संजय राऊतांना टोला हाणला आहे.

संजय राऊत काय म्हणाले होते?

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहापैकी तीन जागा भाजपने जिंकल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. ते दररोज भाजपवर टिकास्त्र सोडताना दिसत आहेत. असचं एक आणखी गंभीर वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. ‘ईडीला ४८ तासांसाठी आमच्या ताब्यात द्या, बघा देवेंद्र फडणवीसही आम्हाला मतदान करतील’, असा खोचक टोला त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लगावला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button