Uncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर ईडीला सामोरे जाणार- अनिल देशमुख यांनी बाजू मांडली

मुंबई: सध्या ईडीच्या रडारवर राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख असून त्यांना ३ वेळा ईडीकडून समन्स पाठवण्यात आला आहे. पण त्यांनी काही ना काही कारण देऊन ईडीसमोर जाणे टाळले आहे. यातच ईडीने त्यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली गेली आहे. अनिल देशमुखांची ४ कोटी नव्हे तर ३०० कोटी मालमत्ता जप्त केल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अनिल देशमुख हे मागील काही दिवसांपासून कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे ते अंडरग्राऊंड झाल्याची चर्चा देखील होती. आता अनिल देशमुख हे खुद्द सगळ्यांसमोर आले व त्यांनी आपली बाजू मांडली आहे.

 

‘ईडीने आपल्या कुटुंबाची अंदाजे 4 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यात आपला मुलगा सलील देशमुख याने 2006 मध्ये घेतलेल्या 2 कोटी 67 लाखांच्या जमिनीचाही समावेश आहे. मात्र काही वर्तमानपत्रांत 2006 मध्ये घेतलेली 2 कोटी 68 लाखांची जमीन तिनशे कोटींची सांगण्यात आली आहे. आणि ईडीने आपली तिनशे कोटींची जमीन जप्त केल्याचा गैरसमज पसरवण्यात आल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केला. तसंच आपण सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर सर्वोच्च न्यायालय जो निकाल देईल, त्यानतंर मी स्वत: ईडीसमोर माझं म्हणणं मांडायला जाणार आहे, असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं.

 

अनिल देशमुख यांनी पुढे म्हटले आहे कि, ईडीकडून मला समन्स आले आहे, पण मी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जेव्हा न्यायालय योग्य निर्णय देईल, तेव्हा मी ईडीला सामोरे जाणार आहे. ईडीने तीन वेळा समन्स देऊनही टाळाटाळ केल्यामुळे त्यांच्यावरील संशय अजून वाढत असल्याचा स्पष्ट होत आहे. आता सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देईल यावर लक्ष सर्वांचे लक्ष आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button