TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमुंबईराजकारणराष्ट्रिय

उत्तरप्रदेशातील भारत जोडो यात्रेत भावा-बहिणीच्या अनोख्या प्रेमाचं दर्शन…

राहुल गांधींनी बहीण प्रियांकाचे केले लाड, भारत जोडो यात्रेतील सर्वात क्युट व्हिडिओ

अहमदाबाद : काँग्रेसची भारत जोडो यात्रा 9 दिवसांच्या ब्रेकनंतर दिल्लीतून उत्तर प्रदेशात गेली आहे. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे स्वागत प्रियांका गांधी यांनी केले. पदयात्रा जेव्हा दिल्लीत पोहोचली होती तेव्हा राहुल गांधी यांनी सुरक्षेच्या प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आता भाजपची सत्ता असलेल्या उत्तर प्रदेशात भारत जोडो यात्रा पोहोचली आहे.

राहुल गांधींसह भारत जोडो यात्रेचे उत्तर प्रदेशात स्वागत करताना प्रियांका गांधी यांनी भाषण केलं. यावेळी राहुल गांधींचे कौतुक केले. सर्व ताकद त्यांच्याविरोधात असतानाही ज्या पद्धतीने राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत आहेत त्याबद्दल अभिनंदन. भारत जोडो यात्रेत व्यासपीठावर एकत्र बसले असताना राहुल गांधी यांनी बहीण प्रियांका गांधी यांचे लाड केले. यावेळी त्यांनी प्रियांका यांच्या खांद्यावर हात टाकत त्यांच्या गालावर अन् कपाळावर किस केलं.

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात बहिण भावाच्या नात्यातले काही क्षण दिसून येतात. यात्रेवेळी सर्व नेत्यांसोबत राहुल गांधी आणि प्रियांका गांधी बसले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button