breaking-newsमहाराष्ट्र

घरच्या आगीत होरपळून भावंडांचा मृत्यू

अचानक लागलेल्या भीषण आगीच्या भक्ष्यस्थानी पडून त्यामध्ये दोन भावंडांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना काल रात्री तालुक्यातील साखरीनाटे येथे घडली. यामध्ये दुर्दैवीरीत्या फातिमा मुदस्सर दर्वेश (५) आणि नुमिर मुदस्सर दर्वेश (वय ७) या भावंडांचा समावेश आहे. तर घटनेचा मानसिक धक्का बसून ताजुद्दीन अब्दुल हमीद तमके यांचा रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाला. एक ते दोन तासाच्या कालावधीतील अथक परिश्रमानंतर साखरीनाटे ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत दर्वेश यांचे संपूर्ण घर त्यामध्ये जळून खाक झाले होते.

शेजारच्या घरामध्ये कार्यक्रम असल्याने काल रात्री मुदस्सर फातिमा आणि नुमिर या दोन्ही मुलांना घरामध्ये झोपवून पत्नीसह शेजारच्या घरामध्ये गेले होते. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने परतीचा पाऊस पडत असल्याने साखरीनाटे येथे गेलेल्या दोन दिवसांपासून वीजपुरवठा खंडीत झालेला आहे. त्यामुळे घरामध्ये उजेडासाठी मेणबत्ती पेटवून ठेवली होती. पेटविलेली मेणबत्ती वितळली आणि खाली अंथरुणावर पडली. त्यातूनच अंथरुणाने पेट घेत आगीचा भडका उडाला. या आगीमध्ये मुदस्सर यांचा घरातच टेलरिंगचा व्यवसाय असल्याने घरामध्ये मोठय़ाप्रमाणात कपडे होते. त्यांनीही पेट घेतला आणि काही क्षणामध्ये आगीने रौद्ररूप धारण केले. अचानक घराला लागलेली आणि पसरलेला धूर त्यातच वीज गायब असल्याने पसरलेल्या काळोख अशा स्थितीमध्ये आग विझविण्यासाठी लोकांची एकच धावपळ आणि आरडाओरड सुरू झाली. घराभोवती दाटीवाटीने घर असल्याने आग भीषण रूप घेऊन मोहल्ल्यामध्ये आग पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे साखरीनाटे ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केले. त्यातून सुमारे दीड तासाच्या कालावधीनंतर आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताट नाटे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लोकेश कानसे, उपनिरीक्षक श्वेता पाटील यांसह सर्व पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनीही ग्रामस्थांना आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली. आग आटोक्यात आली असली तरी, या साऱ्या धावपळीमध्ये घरामध्ये मुदस्सरची दोन्ही मुले अडकून पडल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही.

मात्र आग आटोक्यात आल्यानंतर लोकांनी घरामध्ये प्रवेश केला तेव्हा दोन्ही मुलांचे होरपळल्या स्थितीमध्ये मृतदेह पाहून सारेच हादरून गेले, तर मुदस्सर आणि त्यांच्या पत्नीने चित्र पाहून टाहो फोडला. आगीमध्ये होरपळून मृत्यूमुखी पडलेल्या दोन्ही मुलांच्या मृतदेहांचे आज पहाटेच्या दरम्यान दफन करण्यात आले. दरम्यान, या घटनेचा जबर मानसिक धक्का बसलेले मुदस्सरचे मित्रा ताजुद्दीन अब्दुल हमीद तमके यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना उपचारासाठी तातडीने रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले. तेथून अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलविण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचा आज मृत्यू झाला. दरम्यान जिल्हा परिषदेने माजी शिक्षण सभापती दिपक नागले, पंचायत समिती सभापती अभिजीत तेली, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सचिव अजित यशवंतराव, प्रभारी सहाय्यक गटविकास अधिकारी सुशांत एकल यांनी आज घटनास्थळी जावून पाहणी केली.

आठ वर्षांच्या नुमिर साखरीनाटे येथील आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये तर, पाच वर्षांची फातिमा फिशरीज हायस्कूलमध्ये केजीत शिकत होती. टेलरिंगचा व्यवसाय करणाऱ्या मुदस्सर दर्वेश यांना मच्छी विक्री व्यवसाय करून त्यांनी पत्नी त्यांना कुटुंबाला हातभार लावत होती. साऱ्यांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या या कुटुंबावर काळाने घाला घातला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button