breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

सौदी अरेबियाकडून ट्रम्प यांच्या निर्णयाचे स्वागत

रियाध – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी झालेल्या अणु करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घोषित केल्यानंतर त्याच्या जगभरातून विविध प्रतिक्रीया उमटत आहेत. अमेरिकेच्या या निर्णयावर रशियाने नाराजी व्यक्‍त केली आहे. अमेरिकेचा हा निर्णय अस्थैर्य निर्माण करणारा आहे असे रशियाने म्हटले आहे तर युरोपियन समुदायानेही या कराराबाबत इराणची पाठराखण करीत आम्ही या करारावर ठाम आहोत असे म्हटले आहे.

तथापी सौदी अरेबियाने मात्र ट्रम्प यांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. या करारातून अमेरिकेने बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतला आहे तसेच त्यांच्यावर निर्बंध लागू करण्याचा जो निर्णय घेतला आहे तो स्वागतार्ह आहे असे सौदी अरेबियाच्या विदेश मंत्रालयाने एका निवेदनात नमूद केले आहे.

आखाती देशातील सौदी अरेबियाचे मित्र असलेल्या संयुक्त अरब अमिरात आणि बहारीन या देशांनीही ट्रम्प यांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. अमेरिकन नौदलाच्या काही युद्धनौका सध्या बहारीन जवळील समुद्रात तैनात आहेत. हे ठिकाण सौदी अरेबिया आणि इराण यांच्या मध्यावर आहे. ट्रम्प यांनी हा निर्णय घोषित करण्यापुर्वी सौदी अरेबिया आणि आखातातील आपल्या काही मित्र राष्ट्रांच्या प्रमुखांशीही चर्चा केली होती.

सौदी अरेबियाने म्हटले आहे की इराणने केलेल्या करारानंतर त्यांच्यावरील आर्थिक निर्बंध मागे घेण्यात आले होते. त्याचा गैरफायदा घेऊन इराणने या भागातील स्थैर्य धोक्‍यात आणले होते पण आता ट्रम्प यांनी त्यांच्यावर पुन्हा निर्बंध लागू करून चांगला निर्णय घेतला आहे. रियाधचे संयुक्तराष्ट्रांमधील प्रतिनिधी प्रिंस खलिद बिन सलमान यांनी म्हटले आहे की आर्थिक निर्बंध उठवण्यात आल्यानंतर इराणने जगभरातील दहशतवाद्यांना केली जाणारी आर्थिक मदत दुप्पट केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button