breaking-newsमहाराष्ट्र

राज्यात तोटय़ात असलेली बीएसएनएल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्य़ात फायद्यात

  • महिन्याकाठी एक कोटी ७५ लाखांचे उत्पन्न

चंद्रपूर – भारत संचार निगम लिमिटेडची मोबाईल व लॅन्डलाईन सेवा संपूर्ण राज्यात तोटय़ात असली तरी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हय़ात फायद्यात आहे. बीएसएनएल जिल्ह्य़ात प्रथम क्रमांकावर असून महिन्याकाठी एक कोटी ७५ लाखाचे उत्पन्न आहे. चंद्रपूर जिल्हय़ात गेल्या बारा वर्षांत ४७ हजार लॅन्डलाईन फोन बंद झाले व आर्थिक उत्पन्न ४० कोटीवरून थेट २० कोटीवर आल्याची माहिती महाप्रबंधक अरविंद पाटील यांनी दिली. बीएसएनएल स्पर्धेत मागे पडण्यास केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत असल्याची बाबही त्यांनी मान्य केली.

बीएसएनएल स्थापना दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बीएसएनएलच्या नवीन उपक्रमांबद्दल महाप्रबंधक पाटील, उपमहाप्रबंधक आर.एम. कोजबे व मुख्य लेखा अधिकारी अनिल सहारे यांनी माहिती दिली. २००६ मध्ये चंद्रपूर जिल्हय़ात बीएसएनएलचे सर्वाधिक ६० हजार लॅन्डलाईन फोन होते, परंतु आज केवळ १३ हजार ६१८ लॅन्डलाईन फोन आहेत. गेल्या बारा वर्षांत ४५ लॅन्डलाईन फोन बंद झाले. चंद्रपूर जिल्हय़ाचे २००६ मध्ये बीएसएनएलचे वार्षिक उत्पन्न ४० कोटी होते. आज केवळ २० कोटी आहे. तीन ते चार वर्षांपूर्वी ते २६ ते २८ कोटी होते. आज बीएसएनएलचे ५ हजार ९६२ ब्रॉडबॅन्ड कनेक्शन आहेत. १ लाख ५४ हजार १२७ मोबाईलधारक असून यामध्ये १ लाख ५० हजार ८७३ प्रिपेड तर ३ हजार २५४ पोस्टपेड मोबाईलधारक आहेत. बीएसएनएलची ३ जी सेवा ही चंद्रपूर, मूल, ब्रम्हपुरी, भद्रावती, वरोरा, बल्लारपूर व गडचांदूर येथे सुरू झाली असून येत्या काळात चिमूर, नागभीड, गोंडपिंपरी, सिंदेवाही व राजुरा येथे सुरू होणार आहे. नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्कने जिल्हय़ातील ३२४ ग्रामपंचायती जोडल्या असून उर्वरित ५०५ ग्राम पंचायतींना तात्काळ जोड देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पाटील यांनी दिली. बीएसएनएलची एफटीटीएच सेवेत चंद्रपूर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. प्रथम क्रमांकावरील पुणे जिल्हय़ात ५ हजार कनेक्शन तर चंद्रपूर जिल्हय़ात ६५० च्या जवळपास कनेक्शन आहेत.

इतरत्र बीएसएनएल असतानाच गडचिरोली जिल्हय़ात बीएसएनएल फायद्यात आहे, अशीही माहिती महाव्यवस्थापक पाटील यांनी दिली. आजच्या घडीला गडचिरोलीत ३ लाख ४७ हजार बीएसएनएल मोबाईल ग्राहक आहेत. त्याच्या पाठोपाठ ४ हजार लॅन्डलाईन कनेक्शन आहेत. २२०० ब्रॉडबॅन्ड कनेक्शन आहेत. महिन्याकाठी १ कोटी ७५ लाखाचे उत्पन्न आहे. गडचिरोली पाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्हय़ातही बीएसएनएल आघाडीवर आहे. गडचिरोली नक्षलवादग्रस्त जिल्हा असल्याने मोबाईल फोन सेवा ठप्प करण्यासाठी नक्षलवादी टॉवर जाळपोळ करतात. मात्र, या घटना कमी झाल्यामुळे बीएसएनएलचे नुकसानही कमी झाले आहे. येत्या काळात बीएसएनएलच्या अनेक नवीन सुविधा ग्राहकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button