breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

PIMPRI : पिंपरीत सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचे “मौन आंदोलन”

पिंपरी (महा ई न्यूज) – पेट्रोल, डिझेल, गॅसचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य मानसाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. महागाईमुळे त्यांना जीवन जगणे कठीण झाले आहे. बेरोजगारी वाढली असून सरकारने दिलेली आश्वासने फसवी ठरत आहेत. याच्या निषेधार्त रॉष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज मंगळवारी (दि. 2) महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यभरात मौन आंदोलन सुरू केले आहे. पिंपरीत देखील भाजप सरकारच्या निषेधार्त शहर राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी मौन आंदोलन सुरू केले आहे.

पिंपरी, खराळवाडी येथील पक्ष कार्यालयासमोर राष्ट्रवादीच्या मौन आंदोलनाला सुरुवात झाली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, प्रवक्ते फजल शेख, नगरसेविका संगीता ताम्हाणे, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, नगरसेविका शमीम पठाण, निलेश पांढारकर, राजेंद्र साळुंखे, विजय लोखंडे, आनंदा यादव आदी सहभागी झाले आहे.

राष्ट्रवादीच्या आंदोलनकर्त्यांनी याठिकाणी एक फलक लावला आहे. त्यावर राफेल विमान बनविण्याची एचएल कंपनीची क्षमता नाही, हिंसा – सनातनवर बंदी कधी घालणार?, अशांती – कर्ज माफी घोषीत केल्यानंतर शेतक-यांच्या आत्महत्या थांबल्या का?, आत्महत्याबद्दल कोणावर 302 कलमानुसार गुन्हा दाखल करणार? असे प्रश्न विचारले आहेत.

शेती मालाला हमीभाव नाही, शेतक-यांची फसवी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, कामगार धोरण, महिला व युवतींवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती गुन्हेगारी आदी विषयात सरकार अपयशी ठऱले आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाचा या मौन आंदोलनाच्या माध्यमातून निषेध करत असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी सांगितले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button