ताज्या घडामोडी

घटस्फोटाचे वाढते प्रमाण एक सामाजिक समस्या – सीए सुहास गार्डी

पिंपरी (Pclive7.com):- लग्न जुळणे आणि टिकून राहणे ही एक आव्हानात्मक बनले आहे. लग्न जुळलेच ते किती दिवस टीकेल हे सांगता येत नाही. वाढते घटस्फोटाचे प्रमाण हि एक सामाजिक समस्या बनली आहे. कौटुंबिक संस्था टिकविण्यासाठी जीवशास्त्रापेक्षा जीवनशास्त्राचे प्रशिक्षण देण्याची आज गरज आहे असे मत पिंपरी चिंचवड सीए इन्स्टिट्यूटचे माजी अध्यक्ष सीए सुहास गार्डी यांनी व्यक्त केले.
क्रांतीसूर्य प्रतिष्ठान च्या वतीने कासारवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या वधू वर मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी इतिहास अभ्यासक जगन्नाथ लडकत, कविता भोंगाळे- कडू, माजी नगरसेविका सुवर्णा बर्डे, विकास बर्डे, दिगंबर यावतकर, राजेंद्र राजापुरे, संतोष लोंढे, हिरामण भुजबळ, स्वाती शिर्के, अनिता कडू, अंबाडकर, सत्यशोधक चित्रपटाचे कार्यकारी निर्माते शिवा बागूल, श्रीकांत बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.
सीए गार्डी पुढे म्हणाले कि, विवाह हा दोन मनांचे मनोमिलन असते मात्र हल्ली आर्थिक आणि भौतिक गोष्टी, दोन्ही पक्षाकडून ठेवल्या जाणाऱ्या अवास्तव अपेक्षा यामुळे विवाह जुळण्यास विलंब होत आहे. लग्न टिकवण्यासाठी पती पत्नीमध्ये सुसंवाद असणे आवश्यक आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे घटस्फोटाचे मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ही एक सामाजिक आणि कौटुंबिक समस्या बनली आहे. लग्न टिकवण्यासाठी समुपदेशनाची गरज आहे. कौटुंबिक संस्था टिकविण्यासाठी जीवशास्त्रापेक्षा जीवनशास्त्राचे प्रशिक्षण देण्याची आज गरज आहे.
श्री. लडकत म्हणाले कि, लग्न जुळविण्यावर जसा भर दिला जातो तसाच भर जर लग्न टिकवण्यात दिला पाहिजेत. तसेच लग्नाचे भांडवल करू नये असा संदेश त्यांनी समाजाला दिला. क्रांतिसूर्य प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती देणाऱ्या “स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. 
प्रास्ताविक विनोद आजगावकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालक शिल्पा लोंढे, कू. मयुरी व्हरेकर, निलेश जोल्हे, दिलीप भेले यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन क्रांतिसूर्य मंडळाचे अध्यक्ष राधेश्याम चरडे यांनी केले. 
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button