breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोठी बातमी : चिंचवड विधानसभा मतदार  संघासाठी मनसेचा भाजपला पाठिंबा

पिंपरी । प्रतिनिधी

दिवंगत लोकप्रिय आमदार लक्ष्मण भाऊ जगताप  यांच्या निधनानंतर  चिंचवड मतदार संघामध्ये पोट  निवडणूक होत आहे, या निवडणुकीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने  भारतीय जनता पक्षाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. 

महाराष्ट्र विधानसभेच्या दोन आमदारांचे नुकतेच दुःख निधन झालेला आहे या निधनामुळे रिक्त झालेल्या  विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहेत , आदरणीय राज साहेब नेहमी सांगतात जेव्हा एखादा विद्यमान लोकप्रतिनिधी यांचे निधन होते, ती पोट निवडणूक बिनविरोध करावी, याच अनुषंगाने आज पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष महेश दादा लांडगे, एकनाथजी पवार ,  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसेचे नेते  राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर , अनिलजी शिदोरे सर, प्रभारी किशोर भाऊ शिंदे , हे सर्व मनसे कार्यालय पिंपरी या ठिकाणी उपस्थित होते व चर्चा करून  राज साहेब यांच्या आदेशा ने आज  चिचवड विधानसभेसाठी  भारतीय जनता पक्षाला आज पाठिंबा देण्यात आला

या निवडणुकीमध्ये सध्या तरी पक्षाचे कोणतेही कार्यकर्ते प्रचार यंत्रणेमध्ये सहभागी होणार नाहीत पुढील नियोजन राजसाहेब यांच्या आदेशाने केले जाईल.  

या  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे नेते अनिल जी शिदोरे, मनसे नेते – राजेंद्र उर्फ बाबू वागस्कर , प्रभारी किशोरजी शिंदे, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष महेश लांडगे, महाराष्ट्र प्रभारी  एकनाथ दादा पवार , अनुपजी मोरे , त्याचप्रमाणे  आरपीआयचे अध्यक्ष स्वप्निल कांबळे उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button