ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

सोसायटी धारकांच्या समस्या निवारणासाठी सहविचार सभेचे आयोजन

चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन चा पुढाकार

पिंपरी : चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन मार्फत रविवारी (दि. 15) सकाळी साडे दहा वाजता सहविचार सभेचे आयोजन केले आहे. सर्व सोसायटी धारकांसाठी विविध अडचणी आणि येणार्‍या समस्या सोडविण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्णानगर येथील सेक्टर 17 मधील महापालिकेच्या बहुउद्देशीय सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.

शहरातील सोसायटीधारकांना दैनंदिन विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाच्या पातळीवर हे प्रश्न रखडले जात आहेत. त्याला सकारात्मक गती दिली जात नाही. यावर तोडगा काढण्यासाठी विचारविनिमय करण्यासाठी फेडरेशनच्या वतीने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत विविध मुद्दयांवर चर्चा केली जाणार आहे. यामध्ये फेडरेशनच्या कार्याचा आढावा व भविष्यात करावयाच्या कामाबाबत नियोजन. आदर्श उपविधीनुसार सोसायटी चालवण्याबाबत सखोल मार्गदर्शन. बिल्डरकडून सोसायटी हस्तांतरण करून घेत असताना करावयाच्या प्रक्रियेची माहिती दिली जाणार आहे.

तसेच सोसायटी बिल्डरकडून हस्तांतरण करून घेताना घ्यावयाची विविध कागदपत्रे तसेच याबाबत येणार्‍या विविध अडचणी बाबत मार्गदर्शन व मदत करणे. बिल्डरकडून सोसायटीची अपूर्ण असणारी कामे, विविध समस्या, बिल्डरकडून होणार्‍या त्रासाबाबत मार्गदर्शन आणि मदत करणे. सोसायटीच्या निवडणूक प्रक्रियेची माहिती देणे. सोसायटीच्या देखभाल खर्चाबाबत आणि तो वसूल करण्याबाच्या प्रक्रियेबाबत चर्चा केली जाणार आहे. तसेच अभीहस्तांतरण ( कन्व्हेन्स डीड )आणि मानीव अभीहस्तांतरण ( डिम्ड कन्व्हेन्स) बाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या सह थकीत मेंटेनन्स वसुली बाबतची पूर्ण प्रक्रियेची माहिती दिली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

पिंपरी-चिंचवड शहरातील बर्‍याच गृहनिर्माण संस्थांमध्ये आदर्श उपविधीनुसार सोसायट्या संचलित करत असताना अनेक अडचणी येतात. तसेच शहरातील अनेक सोसायट्यांमधे बांधकाम व्यावसायिकांकडून गृहप्रकल्पाचे काम करत असताना अनेक नियमबाह्य कामे केली जातात. या अडचणी व समस्या सोसायटीधारकांना आहेत. याबाबत या सभेमध्ये मार्गदर्शन व प्रत्यक्ष मदत केली जाणार आहे.

– संजीवन सांगळे, अध्यक्ष, चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button