breaking-newsक्रिडा

गावसकर-मांजरेकर यांच्यात मतभेद; कोहली ठरला कारण

टीम इंडियाचा ३ ऑगस्टपासून विंडीज दौरा सुरु होणार आहे. टी २० मालिकेने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची रविवारी निवड करण्यात आली. निर्धारित षटकांसाठी वेगळा आणि कसोटी क्रिकेटसाठी वेगळा कर्णधार अशी पद्धत भारतीय संघात येणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष होते, पण तीनही प्रकारांमध्ये विराट कोहली याच्याकडेच टीम इंडियाच्या कर्णधारपदाची धूरा सोपावण्यात आली. माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी या गोष्टीवर नाराजी व्यक्त करत विराटकडेच कर्णधारपद कायम कसं हा प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्यावर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी उत्तर दिलं आहे.

माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी विराट कोहलीकडे कर्णधारपद देण्याच्या निर्णयावर टीका केली. निवड समितीने विराट कोहलीची कर्णधारपदी नियुक्ती करण्याआधी कोणतीही चर्चा केली होती का? असा सवाल गावसकरांनी विचारला. मिड डे या इंग्रजी वृत्तपत्रात लिहलेल्या स्तंभात त्यांनी आपले विचार मांडले. “आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ निवडायच्या आधी, निवड समितीने कर्णधारपदासाठी बैठक बोलावणं गरजेचं होतं. माझ्या माहितीनुसार, विश्वचषकापर्यंतच विराट कोहलीकडे कर्णधारपद होतं. विश्वचषकात विराटकडून ज्या अपेक्षा केल्या जात होत्या, त्याप्रमाणे त्याची कामगिरी झालेली नाही. संघातील काही खेळाडूंना खराब कामगिरीचं कारण देत जागा नाकारण्यात आली, मग विराटने त्याच्याकडून होत असलेल्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे का?” गावसकरांनी आपलं परखड मत मांडलं.

माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना मात्र गावसकर यांचे मत पटलेले नाही. “सुनील गावसकर यांचा मान राखून मी सांगतो की त्यांनी विराटचे कर्णधारपद आणि भारतीय निवड समितीबाबत मांडलेले मत मला पटलेले नाही. निवड समिती अत्यंत उत्तम प्रकारे कार्य करत आहे. विश्वचषक सामन्यात विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने खूप चांगली कामगिरी केली. विश्वचषकातील सामन्यांमध्ये भारताने ७ सामने जिंकले, तर २ सामने गमावले. त्यातीलही १ सामना अत्यंत कमी फरकाने गमवावा लागला, अशा शब्दात मांजरेकर यांनी विराटला पाठिंबा दर्शवला आहे.

Sanjay Manjrekar

@sanjaymanjrekar

Respectfully disagree with Gavaskar Sir with his views on Indian selectors & Virat being retained as capt. No, Ind did not put in a ‘much below par WC performance’, they won 7 lost two. Last one very narrowly. And integrity a far more important quality as selector than stature.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button