breaking-newsमनोरंजन

रिया चक्रवर्तीची ईडीकडून तब्बल आठ तास चौकशी

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी त्याची कथित प्रेयसी रिया चक्रवर्तीविरोधात ईडीने शुक्रवारी तब्बल आठ तास चौकशी केली. तिच्यावर पैशांची अफरातफर केल्याचा आरोप सुशांतच्या वडिलांनी केला होता. त्यामुळे रिया चक्रवर्तीसोबतच, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, भाऊ शौविक चक्रवर्ती, सुशांतची माजी मॅनेजर श्रुती मोदीही ईडीच्या कार्यालयात उपस्थित होते.

रिया आणि तिचा भाऊ शौविका यांनी काही कंपन्या स्थापन केल्या आहेत. मात्र, या कंपन्यांचा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही. या कंपन्या मनी लॉन्ड्रिंगसाठी स्थापन करण्यात आल्या होत्या का? या कंपन्यांचं रजिस्ट्रेशन होतं का? असे सवाल ईडीकडून उपस्थित करण्यात आले आहेत. रिया चक्रवर्तीकडे कोट्यवधी रुपये किमतीचे दोन फ्लॅट असल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं आहे. या फ्लॅटमधील गुंतवणुकीबाबत रियाची कसून चौकशी झाली.

दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, ईडीच्या चौकशीत रिया सहकार्य करत नव्हती. ईडीच्या चौकशीदरम्यान जेव्हा रियाला तिच्या संपत्तीची कागदपत्रे दाखवण्यास सांगितलं असता तिने टाळाटाळ केल्याचं समजतंय. संपत्तीची कागदपत्रे ही सीएजवळ असल्याचं रियाने सांगितलं. जेव्हा ईडीने रियाच्या सीएकडे कागदपत्रांविषयी विचारणा केली असता त्यांनी ते रियाकडेच असल्याचं सांगितलं. रियाला दुसऱ्यांदा कागदपत्रांविषयी विचारले असता तिने लक्षात नसल्याचं सांगत उडवाउडवीची उत्तरं दिल्याचं कळतंय.

दुसरीकडे बिहार सरकारच्या सीबीआय चौकशीच्या प्रस्तावानंतर केंद्र सरकारने सुशांतच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. केंद्र सरकारने याबाबत आदेश दिले. सीबीआयने तातडीने या प्रकरणी रिया चक्रवर्ती, तिचे वडील इंद्रजीत चक्रवर्ती, आई संध्या चक्रवर्ती, भाऊ शोविक चक्रवर्ती, मॅनेजर सॅम्युअल मिरांडा, माजी मॅनेजर श्रुती मोदी यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button