breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेला हादरवणारी अल कायदा अजूनही सक्रीय पण ISIL जास्त धोकादायक

अमेरिकेला हादरवून सोडणारी अलकायदा ही दहशतवादी संघटना अजूनही संपलेली नाही. अफगाणिस्तानात अलकायदा आजही सक्रीय असून पाकिस्तानच्या लष्कर-ए-तैयबा आणि हक्कानी नेटवर्कसोबत मिळून काम करत आहे. अलकायदाचा म्होरक्या आयमन अलजवाहिरीची प्रकृती तसेच त्याचा उत्तराधिकारी कोण असेल? याबद्दल काही प्रश्न आहेत असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या अल कायदा निर्बंध समितीच्या २४ व्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. निर्बंधांवर देखरेख ठेवणाऱ्या टीमकडून दर सहा महिन्यांनी अल कायदा, इसिस आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या संघटनांचा अहवाल सुरक्षा परिषदेला सोपवला जातो. आयमन अलजवाहिरीची प्रकृती, उत्तराधिकाऱ्याची निवड याबद्दल संशय असला तरी अलकायदा अजूनही सक्रीय आहे.

अल कायदाचे तालिबानबरोबर दीर्घकाळापासून दृढ संबंध आहेत. त्यामुळेच अल कायदाच्या दृष्टीने आजही आपल्या म्होरक्यांसाठी अफगाणिस्तान सुरक्षित आश्रयस्थान आहे. तालिबानच्या मदतीने अलकायदाचा तजाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या बादाकशान प्रांत आणि पाक्तीका प्रांतातील बारमालमध्ये आपली पाळेमुळे घट्ट करण्याचा प्रयत्न आहे.

अलकायदा लष्कर-ए-तैयबा आणि हक्कानी नेटवर्कसोबत मिळून काम करत आहे. अलकायदाचे सदस्य आजही तालिबानासाठी लष्करी आणि धार्मिक मार्गदर्शक म्हणून काम करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. पैसा, प्रसिद्धी, लढण्याचा अनुभव आणि दहशतवादी तयार करण्यामध्ये अलकायदापेक्षा आयएसआयएल अधिक मजबूत असल्याचे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे. त्यामुळे आजच्या घडीला अलकायदा पेक्षा ISIL चा धोका अधिक आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button