breaking-newsताज्या घडामोडी

खोपोलीजवळील रासायनिक लघू उद्योगात स्फोट; एकाचा मृत्यू, चारजण जखमी

रायगड – खोपोलीजवळील साजगाव येथील आर्कोस औद्योगिक नगरीतील रसायनिक उत्पादन करण्याऱ्या जसनोवा केमिकलमधील रिऍक्टरच्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन ते चारजण जखमी झाले आहेत. रात्री २.३०च्या सुमारास झालेला हा स्फोट इतका भीषण होता की त्याच्या आवाजाने तीन-चार किलोमीटरचा परिसर दणाणला. तसेच आर्कोस औद्योगिक नगरीच्या आसपास एक किलोमीटरच्या परिसरातील अनेक घरांच्या खिडक्यांच्या आणि कंपन्यांच्या काचा तुटल्या, पत्र्यांचे शेड कोसळले.

दरम्यान, स्फोटाचा आवाज कानावर पडताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. शेजारील अनेक लघू उद्योगातील कामगारांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी हलविले. तसेच खोपोली नगरपरिषद, एचपीसीएल, रिलायन्स, उत्तम स्टील, टाटा स्टील, कर्जत नगरपरिषद आणि पेण नगरपरिषदेच्या एकूण 10 फायर ब्रिगेड टीमने चार तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आगीवर नियत्रंण मिळविले.

मिळालेल्या माहितीनुसार, खोपोलीजवळील साजगाव येथील आर्कोस औद्योगिक नगरीतील रसायनिक उत्पादन करण्याऱ्या लघू उद्योग जसनोवा केमिकलमधील रिऍक्टरचा रात्री 2.30च्या सुमारास जोरादार स्फोट झाला. या स्फोटाच्या दणक्याने त्या कंपनीसह शेजारच्या इतर कंपन्यांचे शेड पडले, त्यामुळे शेजारील पेट्रोसोल कंपनीतील सुरक्षा रक्षकाच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला. तसेच तीन ते चार सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत. जखमींना खोपोली नगरपरिषद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button