breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 16,98,198 वर

  • मुंबईत 983, पुण्यात 772 नवे रुग्ण

मुंबई – बुधवारी दिवसभरात आढळलेल्या 5,505 नव्या कोरोना रुग्णांमुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 16,98,198 वर पोहोचली आहे. तर एका दिवसात 8,728 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने आणि 125 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावल्याने राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 15,40,005 इतकी झाली असून कोरोनाबळींचा आकडा 44,548 वर पोहोचला आहे. तसेच सध्या 1,12,912 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका मुंबई आणि पुण्याला बसला आहे. मुंबईत बुधवारी कोरोनाचे 983 नवे रुग्ण आढळले, तर 29 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या 2,60,840 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 10,352 इतका झाला आहे. तसेच सध्या 16,576 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

त्याचबरोबर दररोज 2 हजारांहून अधिक रुग्ण आढळणाऱ्या पुणे जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल दिवसभरात पुण्यात 772 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर 30 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 3,25,984 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 7,985 इतका झाला आहे. तसेच काल 729 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केल्याने पुण्यात आतापर्यंत 3,06,674 जण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल आढळलेल्या 772 रुग्णांपैकी 328 रुग्ण हे पुणे शहरातील असून 162 रुग्ण पिंपरी-चिंचवड येथील आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button