breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संतापजनक! पायपीट करीत रुग्णाला वाचविण्याचा प्रयत्न अयशस्वी

  • नंदुरबार जिल्ह्य़ात प्रशासकीय नाकर्तेपणाचा बळी

नंदुरबार |

प्रशासकीय नाकर्तेपणा एखाद्या व्यक्तीच्या जिवावर कसा बेतू शकतो, हे जिल्ह्य़ातील चांदसैली घाटात दरड कोसळल्यामुळे उद्भवलेल्या घटनेमुळे दिसून आले. या घटनेत एका आदिवासी रुग्ण महिलेचा हकनाक बळी गेला. घाटात दरड कोसळल्यानंतर ती लवकर हटविण्यात न आल्याने वाहतुकीमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेतील पत्नीला खांद्यावर टाकून पायपीट करत पतीने रस्ता धरला होता. परंतु, रस्त्यातच तिचे प्राण गेले.

तळोदा तालुक्यातून धडगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर चांदसैली घाट आहे. मंगळवारी रात्री या घाटात दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. अनेक तास उलटूनही दरड हटविण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. सिधलीबाई आदल्या पाडवी या महिलेस रुग्णवाहिकेतून नंदुरबारकडे नेण्यात येत होते. परंतु, रुग्णवाहिका घाटात आल्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. रुग्णवाहिका मागे घेण्याचा प्रयत्न केला असता मागील बाजूसही दरड कोसळल्याने तो मार्गही बंद झाला. शेवटी पत्नीला वाचविण्यासाठी आदल्या पाडवी यांनी तिला खांद्यावर टाकत नंदुरबारच्या दिशेने पायी प्रवास सुरू केला.

परंतु, त्यांचे हे प्रयत्न अधुरेच राहिले. रस्त्यातच सिधलीबाई यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर जाग आलेल्या स्थानिक महसूल प्रशासनाने आणि बांधकाम विभागाने दरड हटविण्याचे काम सुरू केले. अशा घटनांप्रश्नी प्रशासन कधी संवेदनशील होणार, असा प्रश्न स्थानिकांकडून विचारला जात आहे. विशेष म्हणजे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांचा हा मतदारसंघ आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button