breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार प्रितम मुंडेंनी गंभीर गुन्ह्याची माहिती लपविल्याने त्यांच्या उमेदवारी आक्षेप

  • अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी घेतला आक्षेप

बीड – बीड लोकसभेच्या भाजप उमेदवार डाॅ. प्रितम मुंडे यांनी त्यांच्यावर असलेल्या गंभीर स्वरुपाच्या गुन्ह्याची माहिती उमेदवारी लपविली आहे. त्यामुळे त्याचा अर्ज बाद करावा, अशी मागणी अपक्ष उमेदवार कालिदास आपेट यांनी केली.

‘प्रीतम गोपीनाथ मुंडे’ नावाने बीड जिल्ह्यातील नाथरा येथे मतदान यादीत नाव आहे. तर मुंबई येथील वरळीमध्ये प्रीतम गौरव खाडे नावाने त्यांचं मतदार यादीत नाव असल्याची टीकाही कालिदास यांच्य़ाकडून करण्यात आली आहे. त्याचबरोबर मुंबई वरळी येथील प्लॉट 1201 स्थावर मालमत्तेची माहिती प्रीतम मुंडे यांनी लपवली असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. प्रीतम मुंडे यांच्याकडे वेगवेळ्या नावाने दोन आयकर विभागाचे ओळखप्रत्र आहे असंही कालिदास यांनी म्हटलं आहे.

प्रीतम मुंडे या वैद्यनाथ बँकेच्या संचालक मंडळात सहभागी आहेत. त्यांच्यावर गंभीर स्वरूपाच्या गुन्हय़ाची माहिती लपवली. त्यामुळे त्यांचा अर्ज बाद करण्याची मागणी कालिदास यांच्याकडून करण्यात आली आहे.  राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनीदेखील प्रीतम यांच्यावर असे अक्षेप घेतले आहे. निवडणूक अधिकारी या प्रकरणाची 4 वाजता सुनावणी करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button