breaking-newsताज्या घडामोडीपुणे

एकवीरा आईच्या कृपेने महायुतीचाच विजय – उद्धव ठाकरे

कार्ला –  लोकसभा निवडणुकीत शिवसेना- भाजप मित्र पक्षाची महायुती झाली आहे.  या निवडणुकीत महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ठाकरे यांनी कार्ला येथे एकविरा देवीचे आज (बुधवारी) सपत्नीक दर्शन घेतले.

यावेळी रश्मी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख मावळ गजानन चिंचवडे, तालुका प्रमुख राजू खांडभोर, शरद हुलावळे, नगरसेवक सचिन भोसले आदी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “कुठलंही काम करताना एकविरा देवीचा आशीर्वाद घेण्याची आमची परंपरा आहे. आईचे आशीर्वाद घेतल्यावर यश मिळते हा अनुभव आहे. येत्या निवडणुकीत एकविराआईच्या आशीर्वादाने महायुतीच्या उमेदवारांना यश मिळणार आहे.”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button