breaking-newsक्रिडा

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी; यंदाची आयपीएल 19 सप्टेंबरपासून संयुक्त अरब अमिरातमध्ये सुरु होण्याची शक्यता

मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यवहार ठप्प झाल्याचं चित्र होतं. क्रीडा जगतालाही याचा फटका बसला होता. अनेक स्पर्धा आणि क्रिकेटचे सामने कोरोनाच्या भीतीमुळं रद्द करण्यात आले होते. तर, काहींच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले होते. इंडियन प्रिमीयर लीग अर्थात आयपीएललाही याचा फटका बसला होता. पण, अखेर यंदाच्या वर्षीच IPL 2020 चा संग्राम पार पडणार असून, याच्या अधिकृत सारखांचीही घोषणा करण्यात आली आहे.

IPL च्या अध्यक्षपदी असणाऱ्या ब्रिजेश पटेल यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला शुक्रवारी याबाबतची माहिती दिली. १९ सप्टेंबरपासून ८ नोव्हेंबरपर्यंत UAE येथे हे सामने पार पडणार आहेत.

पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात सामन्यांचं वेळापत्रक ठरवण्यासाठीची बैठक असणार आहे. त्याशिवाय सरकारच्या अधिकृत परवानगीचीही प्रतिक्षा असेलच. यंदाच्या वर्षीसुद्धा तब्बल ५१ दिवस क्रिकेटचा हा ‘RUNसंग्राम’ रंगणार असल्याची माहिती पटेल यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button