breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

#CoronaVirus: अकोल्यात रुग्णवाढीचे सत्र कायम

शहरात रुग्ण वाढीचे सत्र कायम आहे. १४ नवीन रुग्णांची शुक्रवारी भर पडली. त्यामुळे जिल्हय़ातील एकूण रुग्णसंख्या ७२६ वर पोहोचली. आतापर्यंत ३४ जणांचे मृत्यू झाले आहेत. सध्या १८७ करोनाबाधितांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.अकोला शहरात वेगवेगळय़ा भागात रुग्ण आढळून येत आहेत.

आज आणखी १४ रुग्णांची नोंद झाली. जिल्हय़ातील एकूण ८९ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ७५ अहवाल नकारात्मक, तर १४ जणांचे अहवाल सकारात्मक आले आहेत. एकूण रुग्णसंख्या तब्बल ७२६ झाली. आज सकाळच्या अहवालानुसार १४ नवे करोनाबाधित आढळून आले. त्या रुग्णांमध्ये पुरुष व महिला प्रत्येकी सात आहेत. यामध्ये गुलजारपुरा, सिंधी कॅम्प, हैदरपुरा येथील प्रत्येकी दोन, तर गोरक्षण रोड, गवळीपुरा, पातूर, बिर्ला कॉलनी, अकोट फैल, बैदपुरा, जुने शहर, मोहता मिल येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळच्या अहवालानुसार एकही सकारात्मक रुग्ण आढळून आला नाही. ६१ अहवाल नकारात्मक आले. करोनाबाधितांच्या जवळून संपर्कात आलेल्यांची तात्काळ तपासणी करून नमुने घेण्यात येत आहेत. शहरात आरोग्य तपासणीच्या मोहिमेने वेग घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button