breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

पाकिस्तानी हवाई हद्दीतून सावधपणे प्रवास करा; घातपात होण्याची शक्यता अमेरिकेचा इशारा

नवी दिल्ली | महाईन्यूज

दहशतवादी कारवायांचा धोका लक्षात घेऊन अमेरिकी विमानांनी पाकिस्तानी हवाई हद्दीतून सावधपणे प्रवास करावा, असा इशारा ट्रम्प सरकारने दिलेला आहे. यासंदर्भात अमेरिकी हवाई कंपन्या, तसेच पायलटना दक्षता बाळगण्यास सांगण्यात आलेले आहे. तणावाचे वातावरण असलेल्या भारत व पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता नसली, तरीदेखील दोन्ही देशांच्या हवाई दलांनी परस्परांवर अचानक हल्ले चढविल्यास अमेरिकी विमानांना धोका पोहोचू शकतो, असेही या इशा-यात म्हटलेले आहे.

या महिन्याच्या एक जानेवारीपासून ते संपूर्ण वर्षभर पाकिस्तानी हवाई हद्दीतील स्थितीवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे अमेरिकेच्या हवाई वाहतूक खात्याने (एफएए) म्हटले आहे. यासंदर्भात अमेरिकेने आपल्या विमान कंपन्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाकिस्तानात विमानतळावर उतरलेल्या किंवा कमी उंचीवरून उड्डाण करणाºया विमानांवर दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता अधिक आहे. विमान उड्डाण करताना किंवा उतरताना दहशतवादी त्याला लक्ष्य करू शकतात. यासंदर्भात एफएएच्या वेबसाईटवर ३० डिसेंबर रोजी माहिती देण्यात आलेली आहे. त्यात असे म्हटले आहे की, काश्मीरमधील वातावरण आणखी बिघडले तर पाकिस्तानच्या हवाई हद्दीतला धोकाही वाढू शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button