breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘कोविड-19’ शी लढताना अभिनेता अमिताभ बच्चन भावूक : मध्यरात्री केले ईश्वराचे नामस्मरण!

मुंबई । अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी त्याचा कोरोना चाचणी अहवाल आला ज्यामध्ये तो संक्रमित असल्याचे आढळले. अमिताभ बच्चन यांच्यासह त्यांचे अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय आणि आराध्या बच्चन देखील कोरोना पॉझिटिव्ह आहेत. अमिताभ सोशल मीडियावर सतत अॅाक्टिव असतात आणि एका पाठोपाठ एक पोस्ट शेअर करत असतात.

रात्री उशिरा अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, ‘सोशल मीडियाच्या सर्व व्यासपीठावर मा झे आणि माझ्या कुटुंबियांचे आरोग्य सुधारण्यासाठी तुमचे आशीर्वाद, प्रेम आणि प्रार्थना प्राप्त होत आहेत. माझ्या कृतज्ञतेला मर्यादा नाही. रुग्णालयाचे काही नियम आहेत. मी जास्त बोलू शकत नाही, फक्त…प्रेम.

याशिवाय, अमिताभ बच्चन यांनी देवाचा एक फोटो शेअर केला आहे ज्यात त्यांनी देवाची आठवण म्हणून लिहिले आहे, त्वमेव माता च पिता त्वमेव ; त्वमेव बंधुश च सखा त्वमेव ; त्वमेव विद्या द्रविनम त्वमेव , त्वमेव सर्वम मम देव देव’ दुसऱ्या  फोटोत अमिताभने लिहिले की, ‘देवाच्या चरणी अर्पण.’ अमिताभ यांच्या या पोस्टवर त्याचे चाहते असे टिप्पणी करीत आहेत की देव लवकरच तुम्हाला बरे करील.

शनिवारी अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना त्यांच्या कोरोना पॉझिटिव्हबद्दल सांगितले होते. अमिताभचे चाहते त्यांना चांगल्या तब्येतीच्या शुभेच्छा देत आहेत. बर्‍याच ठिकाणी बिग बीच्या प्रकृतीसाठीही पूजा चालू आहे.

कोरोना विषाणूने जगभर आपली पावले पसरली आहेत. मुंबईची अवस्था चिंताजनक आहे. बॉलिवूड अभिनेत्री रेखाच्या घरातही कोरोनाने दरवाजा ठोठावला आहे, तर टीव्ही अभिनेता पार्थ समथान देखील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button