breaking-newsTOP News

सोलापूर शहरात आजपासून दहा दिवस कडकडीत बंद

  • 25 हजार अँटीजन टेस्ट घेणार

सोलापूर : कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात आजपासून पुढील दहा दिवसांसाठी कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. शहरा भोवतालच्या तीस गावातही कडक संचारबंदी आहे. या संचारबंदी दरम्यान एकूण 25 हजार अँटीजन टेस्ट केली जाणार आहे. तसेच या संचराबंदीत हॉस्पिटल्स, औषध दुकाने आणि दूध वगळता इतर सर्व आस्थापना बंद राहणार आहे.

दहा दिवसांसाठी म्हणजेच आजपासून 26 जुलैपर्यंत ही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दहा दिवसांच्या कालावधीत नगरपालिका जिल्ह्यातील तब्बल 25 हजार नागरीकांचे अँटिजन टेस्ट करणार आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून स्थानिक पातळीवर लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहेत. त्यासोबत काही ठिकाणी संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. नुकतेच पुण्यातही दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button